ETV Bharat / state

साताऱ्यामध्ये विजय दिवस साजरा; कराडकरांनी अनुभवला हवाई कसरतींचा थरार

बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सोमवारी विजय दिवसाचा मुख्य सोहळा साजरा झाला. विजय ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर पॅराग्लायडर्सनी केलेल्या हवाई कसरती, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांच्या मल्ल खांबावरील आकर्षक प्रात्यक्षिकांनी कराडकरांना मंत्रमुग्ध केले.

Celebrate Vijay Din at Karad in Satara
साताऱ्यातील कराडमध्ये विजय दिवस साजरा
author img

By

Published : Dec 17, 2019, 8:50 AM IST

सातारा - बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सोमवारी विजय दिवसाचा मुख्य सोहळा साजरा झाला. विजय ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर पॅराग्लायडर्सनी केलेल्या हवाई कसरती, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांच्या मल्ल खांबावरील आकर्षक प्रात्यक्षिकांनी कराडकरांना मंत्रमुग्ध केले. कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्यावतीने गेल्या सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे.

साताऱ्यातील कराडमध्ये विजय दिवस साजरा

हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..

1971 च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ झालेल्या या सोहळ्याला विजय ज्योतीचे स्वागत करून प्रारंभ झाला. खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, वैभव नायकवडी, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, अरूण जाधव यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ सेना अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा... पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग

पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅन्ड आणि पोलिसांच्या संचलन पथकाने मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर लष्करी जवानांनी हवाई कसरती सादर केल्या. पॅराग्लायडर्सच्या करसती पाहताना कराडकरांनी श्वास रोखून धरले. त्यानंतर मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांनी मल्ल खांबावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यालाही कराडकरांची दाद मिळाली. पोलीस बँडने देशभक्तीपर धून वाजवत स्टेडियममधील वातावरण भारावून टाकले. राष्ट्रगीताने विजय दिवस सोहळ्याची सांगता झाली. मात्र यंदाच्या सोहळ्यात लष्करी डॉग शो आणि डेअर डेव्हील्स पथक येऊ न शकल्यामुळे कराडकरांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसली.

हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न

Intro:बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडच्या छ. शिवाजी स्टेडियमवर सोमवारी विजय दिवसाचा मुख्य सोहळा साजरा झाला. विजय ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर पॅराग्लायडर्सनी केलेल्या हवाई कसरती, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांच्या मल्ल खांबावरील आकर्षक प्रात्यक्षिकांनी कराडकरांना मंत्रमुग्ध केले. Body:  
कराड (सातारा) - बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडच्या छ. शिवाजी स्टेडियमवर सोमवारी विजय दिवसाचा मुख्य सोहळा साजरा झाला. विजय ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर पॅराग्लायडर्सनी केलेल्या हवाई कसरती, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांच्या मल्ल खांबावरील आकर्षक प्रात्यक्षिकांनी कराडकरांना मंत्रमुग्ध केले. 
  कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्यावतीने गेल्या सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे.
 1971 च्या बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ झालेल्या या सोहळ्याला विजय ज्योतीचे स्वागत करून प्रारंभ झाला. खा. श्रीनिवास पाटील, कोल्हापूरचे श्री. छ. शाहू महाराज, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, वैभव नायकवडी, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, अरूण जाधव यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ सेना अधिकारी उपस्थित होते. 
 पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅन्ड आणि पोलिसांच्या संचलन पथकाने मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर लष्करी जवानांनी हवाई कसरती सादर केल्या. पॅराग्लायडर्सच्या करसती पाहताना कराडकरांनी श्वास रोखून धरले. त्यानंतर मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांनी मल्ल खांबावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यालाही कराडकरांची दाद मिळाली. पोलीस बँडने देशभक्तीपर धून वाजवत स्टेडियममधील वातावरण भारावून टाकले. राष्ट्रगीताने विजय दिवस सोहळ्याची सांगता झाली. यंदाच्या सोहळ्यात लष्करी डॉग शो आणि डेअर डेव्हील्स पथक येऊ न शकल्यामुळे कराडकरांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.