ETV Bharat / state

मनोज जरांगेंच्या सभेनंतर कराडमधील १४ जणांवर दोन दिवसांनी गुन्हा; नोटीस दिली एका महिन्यानंतर, समाज आक्रमक - मनोज जरांगे पाटील सभा

Maratha Reservation : कराडमध्ये १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सभा झाल्यानंतर दोन दिवसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या संदर्भात तब्बल एक महिन्यांनी पोलिसांनी नोटीसा काढल्या आहेत. अचानक नोटीसा पाठवण्यात आल्याने मराठा समाजात तीव्र संताप आहे.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 10:12 PM IST

सातारा Maratha Reservation : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची १७ नोव्हेंबर रोजी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मध्यरात्री सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. परंतु त्याची नोटीस तब्बल एक महिन्याने पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये अनेक अटी-शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे.

१४ जणांवर गुन्हा दाखल : मनोज जरांगे-पाटील यांच्या सभे दिवशी मराठा बांधवांनी प्रशासनाला सहकार्य केलं. सभा शांततेत पार पडली. त्यानंतर १९ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर कराड शहर पोलिसांनी (karad police) गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात संबंधितांना कसलीही सूचना दिली नाही. थेट नोटीसा पाठवल्या. बहुतांश जणांनी नोटीस स्वीकारली नाही. यासंदर्भात सोमवारी (दि. २५) चौकशीला बोलवलं होतं. मात्र, नोटीसा घेणारे आज चौकशीला गेले नाहीत.

Manoj  Jarange Patil
सभेनंतर आलेल्या नोटिसा

अटी-शर्तीसह दिली नोटीस : कराड शहर पोलिसांनी १४ मराठा बांधवांवर केलेली कारवाई वादात सापडली आहे. गुन्हा दाखल केल्याची सूचना संबंधितांना एक महिन्याने नोटीस पाठवून दिली आहे. त्यातच नोटीसमध्ये अटी-शर्ती घातल्यामुळं मराठा समाजात तीव्र संताप आहे. १४ पैकी बहुतांश जणांनी नोटीस घेतली नाही. ज्यांनी नोटीस घेतली ते आज (सोमवारी) पोलीस ठाण्यात हजर राहिले नाहीत.

जमावाने पोलीस ठाण्यात जाणार : पोलिसांच्या या कारवाईला मराठा बांधव सामोरे जाणार आहेत. गुरूवारी (दि. २८) शेकडो मराठा बांधव एकत्र येणार आहेत. त्यानंतर जमावाने ते कराड शहर पोलीस ठाण्यात जाणार आहेत. आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल करा, असा पवित्रा त्याठिकाणी घेतला जाणार आहे.

दरम्यान, याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय.

हेही वाचा -

  1. कुणबी मराठ्यांच्या आतापर्यंत 72 लाख नोंदी सापडल्या आहेत - मनोज जरांगे पाटील
  2. आरक्षणात समानता का नको? मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना सवाल, आंदोलनाची पुढची दिशा 'या' तारखेला ठरणार
  3. कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी मराठवाड्यात कमी, अधिकाऱ्यांचा हलगर्जी केल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.