ETV Bharat / state

Case Registered on Youngsters: भरधाव मोटरसायकलवर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरूणांवर गुन्हा दाखल

पुणे-बंगळुरु महामार्गावर चालत्या मोटरसायकलवर उभे राहून जीवघेणा स्टंट करणाऱ्या दोन तरुणांवर (Case Registered on Youngsters) सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Satara Rural Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Registered on Youngsters
भरधाव मोटरसायकलवर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरूणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 23, 2022, 10:34 PM IST

सातारा: पुणे-बंगळुरु महामार्गावर काही तरी हटके करण्याच्या नादात चालत्या मोटरसायकलवर उभे राहून जीवघेणा स्टंट करणे दोन तरुणांच्या अंगलट आले आहे. स्टंट करणाऱ्या ओंकार हणमंत शिंदे आणि ओंकार आनंदराव सोनवले, रा. लिंब, ता. सातारा यांच्यावर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Satara Rural Police Station) गुन्हा दाखल (Case Registered on Youngsters) झाला आहे.

व्हायरल व्हिडिओवरून पटवली ओळख: ओंकार हणमंत शिंदे आणि ओंकार आनंदराव सोनवले हे साताऱ्याहून लिंब गावाकडे मोटरसायकलवरून जात होते. साताऱ्यातील डी-मार्ट परिसरात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तरूण वेगाने गाडी चालवत होता. तर पाठिमागील तरूण चालत्या गाडीवर उभे राहून स्टंटबाजी करत होता.

महामार्गावरून निघालेल्या कारमधील एका नागरिकाने तरूणांच्या जिवघेण्या स्टंटचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही तरूणांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.