सातारा - साथरोगाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तालुक्यातील टिटवेवाडी येथे जय हनुमान तरुण गणेश मंडळाच्या ३० ते ३२ कार्यकर्त्यांवर बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टिटवेवाडी येथे विसर्जन मिरवणूक सुरू असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. टिटवेवाडी गावच्या हद्दीत देशमुखनगर ते फत्यापूर जाणाऱ्या रस्त्यावर एक लाल रंगाचा नंबर नसलेला ट्रॅक्टर व त्यास चारचाकी ट्रेलर जोडून जय हनुमान तरुण गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. साऊंड सिस्टीम लावून ३० ते ३२ लोक गर्दी करून तोंडाला मास्क न लावता नाचत होते.
पोलिसांनी नंबर नसलेला ट्रॅक्टर, चारचाकी ट्रेलर, अहुजा कंपनीची मशीन, दोन बेस असे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सचिन यादवराव पवार, धनराज श्रीरंग पवार, श्रीधर भरत पवार, विनोद श्रीरंग पवार, प्रमोद मोहन पवार, राहुल सुर्यकांत पवार, धीरज शशिकांत पवार, दादासो रामचंद्र पवार, प्रथमेश भरत पवार, अरुण सर्जेराव पवार, शशिकांत मुगुटराव पवार, वैभव चद्रकांत पवार, विक्रम बाळासो गायकवाड, सोमनाथ जयप्रकाश सावंत, अनिल जोतीराम पवार, अमोल हणमंत पवार, राज दत्ता पवार (सर्व रा.टिटवेवाडी) यांच्यासह इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ, सहायक फौजदार भिमराव यादव, हवालदार मनोहर सुर्वे, विजय सांळुखे, विशाल जाधव, किरण निकम यांनी केली आहे.