ETV Bharat / state

पुस्तकांचे गाव राहणार तीन दिवस बंद

पुस्तकांचं गाव भिलार येथे गावाची जत्रा असल्याने १३  ते १५ फेब्रुवारी या कालावधीत 'पुस्तकांचं गाव' हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली.

भिलार
author img

By

Published : Feb 13, 2019, 1:54 PM IST

सातारा - पुस्तकांचं गाव भिलार येथे गावाची जत्रा असल्याने १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत 'पुस्तकांचं गाव' हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे. अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली.

या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. जत्रेच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ भिलार गावास दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देतात. तसेच देशभरातील पर्यटकांची देखील भिलार येथे सतत रेलचेल सुरू असते.

जत्रेमुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना, शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत भिलार व प्रकल्प कार्यालय पुस्तकांचं गाव यांनी केली आहे.

Intro:सातारा
पुस्तकांचं गाव भिलार येथे गावाची जत्रा असल्याने , दि 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव' हा प्रकलप तात्पुरता बंद राहणार आहे. अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली.

Body:या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. जत्रेच्या निर्मिताने बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ भिलार गावास दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देतात . तसेच देशभरातील पर्यटक देखील भिलार येथे सतत रेलचेल सुरू असते. जत्रे मुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटक शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाच्या सेवा देऊ शकणार नाहीत. या पाश्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे. अशी विनंती ग्रामपंचायत भिलार व प्रकल्प कार्यलय पुस्तकांचं गाव यांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.