ETV Bharat / state

कुबड्यांवर चाललेल्या सरकारचा स्वबळाचा नारा हास्यास्पद - अ‌ॅड. आशिष शेलार - सातारा शहर बातमी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले. पण, सरकार बदलले की आरक्षणही गेले. आघाडी शासनाला ते टिकवता आले नाही. याचे पाप या सरकारकडेच आहे, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारवर केली.

आशिष शेलार
आशिष शेलार
author img

By

Published : Jul 11, 2021, 10:22 PM IST

Updated : Jul 11, 2021, 10:41 PM IST

सातारा - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरले आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असे सांगत आहेत. मुळातच हे सरकार कुबडीशिवाय चालत नाही. त्यामुळे स्वबळाचा नारा देणे हास्यास्पद आहे, अशी टीका भाजपचे आमदार अ‌ॅड. आशिष शेलार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

बोलताना आमदार शेलार

शासनाने घाबरटपणा सोडावा

सातारा येथे रविवारी (दि. 11 जुलै) त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेलार म्हणाले, कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यापाऱ्यांचा रोष वाढत चालला आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी कोठे जायचे हा प्रश्न आहे. गरीबांसाठी मदतीची योजना नाही. तर रोजगार निर्माण करणाऱ्यांसाठीही काही केले नाही. याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे. शासनाने आता घाबरटपणा सोडायला हवा.

पक्षावर कोणीही नाराज नाही

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आमदार शेलार म्हणाले, अध्यक्षपद निवड हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, त्यांनी निवडणुकीची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांच्या खांद्यावर तिन्हीही पक्षांनी बंदूक ठेवली होती. चूक नसताना भाजपच्या आमदारांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळाले नाही. ते नाराज आहेत का, असे त्यांना विचारल्यास आमदार शेलार म्हणाले, उदयनराजे हे राजे आहेत. पक्षावर कोणीही नाराज नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पक्षातील स्थान मोठे व मानाचे आहे. ते कायम राहील. मुंडे कुटुंबातीलही कोणीही पक्षावर नाराज नाही.

ईडीने काम करावे का नको

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले. पण, सरकार बदलले की आरक्षणही गेले. आघाडी शासनाला ते टिकवता आले नाही. याचे पाप या सरकारकडेच आहे, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारवर केली. ईडीच्या जिल्ह्यातील कारवायांबाबत बोलताना आमदार आशिष शेलार यांनी चौकशी यंत्रणेने काम करायचे का नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कर नाही तर डर कशाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे कुंभारगाव बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

Last Updated : Jul 11, 2021, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.