ETV Bharat / state

मलकापूर नगरपालिकेने केलेल्या करवाढीविरोधात भाजपचे लाक्षणिक उपोषण - tax hike

मलकापूर नगरपालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढी विरोधात आणि पालिकेतील एकाधिकारशाही कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी लाक्षणिक उपोषण केले.

Malkapur Municipality
मलकापूर नगरपालिका
author img

By

Published : Jan 23, 2020, 7:58 AM IST

सातारा (कराड) - मलकापूर नगरपालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी उपोषण केले. तसेच सत्ताधार्‍यांच्या एकाधिकारशाही कारभाराविरोधात देखील भाजप नगरसेवकांनी बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी सायंकाळी उपोषणस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. मलकापूर नगरपालिका सत्ताधार्‍यांच्या एककलमी कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे भाजप सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मलकापूर नगरपालिकेने केलेल्या करवाढी विरोधात भाजपचे उपोषण...

हेही वाचा... कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा

पालिकेचा कारभार अकार्यक्षम पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांसह भाजप पदाधिकारी बुधवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले होते. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांची सुरू केलेली पिळवणूक थांबवावी, या मागणीसह 19 टक्के करवाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिला. विरोधी पक्षाच्या गटनेत्या नूरजहाँ मुल्ला, नगरसेवक अजित थोरात, दीनेश रैनाक, निर्मला काशिद, राजू मुल्ला, भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, आबासाहेब गावडे, सुरेश खिलारे, डॉ. सारिका गावडे यांच्यासह विरोधी गटाचे कार्यकर्ते आणि नागरिकही उपोषणात सहभागी झाले होते.

हेही वाचा... 'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत'

'सत्ताधार्‍यांनी केलेली मालमत्ता करवाढ अन्यायकारक आहे. ती रद्द न झाल्यास अन्य नगरपालिकांच्या तुलनेत मलकापूरच्या नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. मलकापुरात रोगराई पसरली असून कोणत्याही उपाययोजना नाहीत. इथे रहायला यायचे म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. भुयारी गटार योजना कुचकामी आहे. मुस्लीम समाजासाठी दफनभूमी नाही. चोवीस तास पाणी योजनेतून नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे, हे पाणी बंद करावे. जिल्हाधिकार्‍यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. बांधकाम व्यावसायिकांची पिळवणूक थांबवावी. महामार्गावरील भाजी मंडई बंद करून वाहतूक कोंडी फोडावी. स्वच्छता अभियानावर उधळपट्टी सुरू आहे. आधी गल्लीबोळात स्वच्छता करावी' अशा मागण्यांसाठी भाजपच्यावतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

हेही वाचा... ट्रकखाली चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

या उपोषणला सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन काशिद, मलकापूर शहरप्रमुख सूर्यकांत मानकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांनी भेट दिली. सायंकाळी भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी उपोषस्थळी येऊन आपण आंदोलकांच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. तसेच नगरपालिकेच्या कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे सांगितले. डॉ. भोसले यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घेतले. भाजपचे नगरसेवक चांगल्या कामाला साथ करतील. परंतु, अन्यायाला त्यांचा तीव्र विरोध करत राहतील. आजच्या उपोषणाचा आणि भाजप नगरसेवकांच्या मागण्यांचा मलकापूर नगरपालिकेचे सत्ताधारी जरूर विचार करतील, असा विश्वासही डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

Intro:मलकापूर नगरपालिकेने केलेल्या मालमता करवाढीच्या आणि सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट, एकाधिकारशाही कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी सायंकाळी उपोषणस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच आंदोलकांना लिंबू-सरबत दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. मलकापूर नगरपालिका सत्ताधार्‍यांच्या एककलमी कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे भाजप सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Body:
कराड (सातारा) - मलकापूर नगरपालिकेने केलेल्या मालमता करवाढीच्या आणि सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट, एकाधिकारशाही कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी सायंकाळी उपोषणस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच आंदोलकांना लिंबू-सरबत दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. मलकापूर नगरपालिका सत्ताधार्‍यांच्या एककलमी कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे भाजप सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
   पालिकेचा कारभार अकार्यक्षम पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांसह भाजपा पदाधिकारी बुधवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले होते. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांची सुरू केलेली पिळवणूक थांबवावी, या मागणीसह 19 टक्के कर वाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिला. विरोधी पक्षाच्या गटनेत्या नूरजहाँ मुल्ला, नगरसेवक अजित थोरात, दीनेश रैनाक, निर्मला काशिद, राजू मुल्ला, भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, आबासाहेब गावडे, सुरेश खिलारे, डॉ. सारिका गावडे यांच्यासह विरोधी गटाचे कार्यकर्ते आणि नागरीकही उपोषणात सहभागी झाले होते. 
  सत्ताधार्‍यांनी केलेली मालमत्ता करवाढ अन्यायकारक आहे. ती रद्द न झाल्यास अन्य नगरपालिकांच्या तुलनेत मलकापूरच्या नागरीकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. मलकापुरात रोगराई पसरली असून कोणत्याही उपाययोजना नाहीत. इथे रहायला यायचे म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. भुयारी गटर योजना कुचकामी आहे. मुस्लीम समाजासाठी दफनभूमी नाही. चोवीस तास योजनेतून नागरीकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी बंद करावे. जिल्हाधिकार्‍यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. बांधकाम व्यावसायिकांची पिळवणूक थांबवावी. महामार्गावरील भाजी मंडई बंद करून वाहतूक कोंडी फोडावी. स्वच्छता अभियानावर फक्त उधळपट्टी सुरू आहे. आधी गल्लीबोळात स्वच्छता करावी, अशा मागण्यांसाठी भाजपच्यावतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 
   या उपोषणला सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष  नितीन काशिद, मलकापूर शहरप्रमुख सूर्यकांत मानकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांनी भेट दिली. सायंकाळी भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी उपोषस्थळी येऊन आपण आंदोलकांच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. तसेच नगरपालिकेच्या कारभाराला योग्य मार्गाने विरोध करणार असल्याचे सांगितले. डॉ. भोसले यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण मागे घेतले. भाजपचे नगरसेवक चांगल्या कामाला साथ करतील. परंतु, अन्यायाला त्यांचा तीव्र विरोध राहील.  आजच्या उपोषणाचा आणि भाजप नगरसेवकांच्या मागण्यांचा मलकापूर नगरपालिकेचे सत्ताधारी जरूर विचार करतील, असा विश्वासही डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.