ETV Bharat / state

साताऱ्यात ३० एकरावर साकारणार जैवविविधता उद्यान

पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सातारा पोलिसांच्या ३० एकर जमीनीवर जैवविविधता उद्यान उभे राहत आहे. हे उद्यान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

author img

By

Published : Jan 27, 2021, 5:49 PM IST

Updated : Jan 27, 2021, 10:55 PM IST

साताऱ्यात ३० एकरावर साकारणार जैवविविधता उद्यान
साताऱ्यात ३० एकरावर साकारणार जैवविविधता उद्यान

सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सातारा पोलिसांच्या ३० एकर जमीनीवर जैवविविधता उद्यान उभे राहत आहे. हे उद्यान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

देशी प्रजातींची लागवड

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सयाजी शिंदे म्हणाले, पुणे-बंगळुरू महामार्गालगत जैवविविधता उद्यान साकारण्याचा देवराईचा मनोदय आहे. सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने ही देवराई उभारणार आहोत. या उद्यानासाठी पोलीस दलाने गोळीबार मैदानाची ३० एकर जागा देऊ केली आहे. या जागेवर देशातील सर्व भारतीय वृक्षांची लागवड केली जाईल. सुवासिक वनस्पती, गवताच्या प्रजाती, राज्य वृक्ष व राज्य फूल, दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पती आदींची लागवड करून शेततळी, पाझर तलावाची निर्मितीही केली जाणार आहे. या कामास प्रारंभ झाला असून, यासाठी पोलीस दल व क्रेडाई संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आहे.

वृक्ष संवर्धनासाठी पुरस्कार

वृक्षलागवड व संवर्धनासाठी काम करणा-या ‘देवराई’च्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वृक्ष संमेलन घेतले जाते. यंदा कोरोनामुळे ते ऑक्टोबर महिन्यात होईल. वृक्ष चळवळ बळकट व्हावी, यामध्ये तरुणांचा व महाविद्यालयांचा सहभाग वाढवा यासाठी प्रथमच निसर्गराजा व निसर्गराणी पुरस्कार देण्याचे देवराईचे नियोजन आहे. संबंधितांनी किती व कोणती झाडे लावली, किती झाडे जगविली याची पाहणी करून प्रत्येकी दहा-दहा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. महाविद्यालयात ज्या पद्धतीने क्रीडा स्पर्धा भरतात, त्याच धर्तीवर वृक्ष लागवड स्पर्धा घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदाचा काटेसावर महोत्सव राधानगरीत

दरवर्षी प्रमाणे यंदाही काटेसावर महोत्सव साजरा केला जाणार असून, यावेळी तो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे होणार असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह्याद्री देवराईचे विजयकुमार निंबाळकर, मधूकर फल्ले, क्रेडाईचे अध्यक्ष जयंत ठक्कर, सागर साळुंखे, कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.

हीही वाचा - मध्य रेल्वे मार्गावर मशीन घसरल्याने दुर्घटना; १ ठार तर २ कामगार जखमी

Last Updated : Jan 27, 2021, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.