सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरिल लिंबखिंड येथे एका परप्रांतीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रामसुंदर सिंह (रा. बिहार) असे हत्या झालेल्या मृताचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो कामगार असून भांडणातून ही घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. दरम्यान, अद्याप संशयित आरोपीचे नाव समोर आलेले नाही. याबाबती अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - जळगावात लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार
हेही वाचा - धक्कादायक ! भिवंडीत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या