ETV Bharat / state

दहिवडीत भाजपची जाहीर सभा; 'आमचं ठरलय' टीम ठरणार टार्गेट

भूमिपूजन कार्यक्रमानंतर दहिवडीच्या बाजारपटांगणावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत "आमचं ठरलंय" टीमला टार्गेट केले जाणार असल्याने माण-खटावच्या जनतेच्या नजरा आजच्या सभेकडे लागल्या आहेत.

दहिवडीत भाजपची जाहीर सभा
author img

By

Published : Sep 16, 2019, 11:05 AM IST

सातारा- माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेमार्फत पाणी देण्याचे ठरले आहे. या योजनांच्या कामांचे आज भूमिपूजन होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर दहिवडीच्या बाजारपटांगणावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सभेत "आमचं ठरलंय" टीमला टार्गेट केले जाणार असल्याने माण-खटावच्या जनतेच्या नजरा आजच्या सभेकडे लागल्या आहेत. उत्तर भागातील ३२ गावांना लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्याच्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे सदरील ३२ गवांना आंधळी धरणातून पाणी पुरवल्या जाणार आहे. याकामासाठी माजी आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची फलश्रुती माण तालुक्यातील गावांना मिळाली आहे.

अगदी कमी कालावधीत या योजनेच्या तांत्रिक आणि शासकीय बाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर या योजनेला कॅबिनेट मंत्रीमंडळाची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या कामाचे टेंडरही निघाले आहे. आज दुपारी अडीच वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माण-खटावचे प्रभारी सदाशिवराव खाडे आणि जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचे भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे.

त्यानंतर दुपारी दहीवडीच्या बाजारपटांगणावर भाजपाचे मंत्री आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडणार आहे. दोनच दिवसांपूर्वी माण खटावमधील 'आमच ठरलय' टीमची दहीवडीत सभा झाली होती. आमदार जयकुमार गोरे त्या सभेतील आरोपांना कोणते उत्तर देणार याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

अनेक गोष्टींचा उलगडा होणार

जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाला 'आमच ठरलय' टीममधील काहींनी विरोध केला होता. त्यांच्या विरोध डावलून गोरेंचा भाजप प्रवेश थेट अमित शहांच्या उपस्थितीत झाला होता. आता जयकुमार गोरेंना उमेदवारी मिळू नये म्हणून टीमचा आटापिटा सुरु आहे.

दहीवडी येथे विरोधात टीममधून एकच उमेदवार देणार असे सांगत ठरवलयवाल्यांनी नकळतपणे जयकुमार गोरेंनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असल्याचे मान्यही केले होते. माण उत्तरच्या ३२ गावांच्या योजनेबाबत टीमने काही आक्षेप घेतले होते. आज भाजपाच्या जलसंपदा मंत्र्यांच्या हस्तेच त्या योजनेच्या कामांचे भूमिपूजन घेऊन जयकुमार गोरेंना विरोधकांनी चपराक दिली आहे.

Intro:सातारा माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याच्या योजनेच्या कामांचे भूमिपूजन आज सोमवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते आणि भाजपाच्या मान्यवरांच्या उपस्थित दुपारी अडिच वाजता पार पडणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली. भूमिपूजन कार्यक्रमानंतर दहिवडीच्या बाजारपटांगणावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत " आमचं ठरलय " टीमला टार्गेट केले जाणार असल्याने माण - खटावच्या जनतेच्या नजरा आजच्या सभेकडे लागल्या आहेत.
Body:माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे आंधळी धरणातून पाणी देण्याच्या योजनेला मंजूरी दिली आहे. अगदी कमी कालावधीत या योजनेच्या तांत्रिक आणि शासकीय बाबी पार पडून कॅबिनेट मंत्रीमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या कामाचे टेंडरही निघाले आहे. आज दुपारी अडिच वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माण - खटावचे प्रभारी सदाशिवराव खाडे आणि जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे.
दुपारी दहीवडीच्या बाजारपटांगणावर भाजपाच्या मंत्री आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडणार आहे. दोनच दिवसांपूर्वी माण खटावमधील आमचंठरलय टीमची दहीवडीत सभा झाली होती. आ. जयकुमार गोरे त्या सभेतील आरोपांना कोणते उत्तर देणार याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

अनेक गोष्टींचा उलगडा होणार ......
(जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाला आमचं ठरलय टीममधील काहींनी विरोध केला होता. त्यांच्या विरोध डावलून गोरेंचा भाजप प्रवेश थेट अमित शहांच्या उपस्थितीत झाला होता. आता जयकुमार गोरेंना उमेदवारी मिळू नये म्हणून टीमचा आटापिटा सुरु आहे. दहीवडीत विरोधात टीममधून एकच उमेदवार देणार असे सांगत ठरलयवाल्यांनी नकळतपणे जयकुमार गोरेंनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असल्याचे नकळतपणे मान्यही केले होते. माण उत्तरच्या 32 गावांच्या योजनेबाबत टीमने काही आक्षेप घेतले होते. आज भाजपाच्या जलसंपदा मंत्र्यांच्या हस्तेच त्या योजनेच्या कामांचे भूमिपूजन घेऊन जयकुमार गोरेंनी विरोधकांना चपराक दिली आहे.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.