सातारा - आंधळीच्या धरणात माणच्या आमदाराने दोन दिवस माणमधील लोकांना एक संदेश पाठवला. उत्तर माणच्या ३२ गावांना उचलून पाणी देण्यासाठी आंधळीच्या धरणात जॅकवेलचं (पाणी पुरवठा विहीर) भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी लोकांना निमंत्रित केले होते. मात्र ज्या बातम्या दिल्या त्यात म्हटले की, सर्वेक्षण आणि अन्वेषण या कामाचे भूमीपूजन हे माण तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे का या आमदाराने केले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.
सहा इंचाची दोनशे फूट खोल बोअर मारायचे काम होते. याचे अधिकृत कोणतेही पत्र अजून उपलब्ध नाही. पण हरकत नाही दुष्काळी भागाला कोण पाणी मागत असेल तर त्याचे कौतुक करणारी आम्ही माणसे आहोत. पण जनतेची दिशाभूल करण्याचे पाप जर कोण करत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. १८ सप्टेंबर २०१८ ला चंद्रकांत पाटील हे माणच्या दौऱ्यावर आले होते. त्यादिवशी १६ गावच्या पाण्याचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर १४ ऑक्टोबरला नामदार चंद्रकांत पाटील हे वडगाव, बिजवडी, पाचवड या दुष्काळी दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी टेंभूमधून वाढीव गावांना पाणी द्यावे त्याचबरोबर माणच्या उत्तर भागाला आंधळी धरणातून उचलून पाणी द्यावे, अशी मागणी केली होती.
पाटील यांनी लगेच अधिकाऱ्यांना सूचना करुन नकाशावरुन प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. असे पाणी देता येते असा अहवाल जिहे-कटापूर व टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न हे आमदार करत आहेत. मागील नऊ वर्षात ज्यांनी कधीसुध्दा टेंभूच्या व उत्तर माणच्या पाण्याचा विषय काढला नाही ते घाईगडबडीने श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी कार्यक्रम घेवून माणच्या जनतेची मोठी दिशाभूल करण्याचे पाप हे करता आहेत.
ही योजना किती तारखेला मंजूर झाली? जॅकवेलसाठी किती निधी लागणार आहे, याचं इस्टिमेट झाले का?
प्रशासकीय मान्यता किती तारखेला मिळाली? या सर्वेक्षणला किती निधी मंजूर केला? या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते दिले नाही.
याशिवाय हे सांगतात की, पाण्यासाठी मुंबईला एक मिटिंग झाली. आजपर्यंत या आमदाराने गल्लीतील मिटींगच्या सुध्दा बातम्या केल्या. १९ जूनला मुंबईला जी बैठक झाली त्या मिटींगमध्ये काय घडले हे का सांगितले नाही. त्या मिटींगमध्ये काय घडले हे जनतेसमोर मांडा. याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्याला या मिटींगला बोलवले नाही असे म्हणायचे धाडस हे आमदार करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यात एवढी ताकद आहे हे सगळे आमचे मंत्री आहेत ज्यावेळी मिटींग लावायची त्यावेळी आमच्या पत्रावर लावू या आमदाराच्या पत्राची काय गरज आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना घेवून हा प्रश्न सुटला पाहिजे. नक्की माणच्या या दोन्ही भागात पाणी आले पाहिजे या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करणारी आम्ही मंडळी आहे. डाॅ. कापसेंचा कृष्णा खोरेची स्थापना करण्यात वाटा आहे, त्यावेळी हे आमदार काय करत होते.
ज्याला गावातून हाकलून दिलेले आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील म्हणत होते हे काँग्रेसचं कडू इंद्रावणं आहे. माणमध्ये हे आमदार म्हणत होते माझा डीएनए काँग्रेसचा आहे. माझी मागणी आहे याचा पहिला डीएनए तपासा नक्की हाय कुणाचे म्हणून तरी याचा डीएनए तपासा. म्हणजे कळेल तरी कोणत्या पक्षाचे आहे, कुठल्या पक्षाचे नक्की काम करतात हे कुणालाच कळायला मार्ग नाही. आमच्या मंत्र्यांच्या दारात जावून बसतात.
विखे पाटलांबरोबर प्रवेश करणार होते पण पक्षाने घेतले नाही. समाजामध्ये डागळलेली प्रतिमा असलेल्या माणसाना भाजपसारखा चांगला पक्ष हा पक्षात घेत नसतो. धड आपण इकडं पण नाय तिकडं पण नाय म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला बदनाम करायचा नावे ठेवायचा धंदा सुरु केला आहे. अशांची जिरवायची भाजप, शिवसेना, रासप, रिपाईच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. आंधळीत दहा महिन्यांनी पाणी येणार असे सगळ्यांनी सांगितले. याचे चार महिने राहिलेत चार महिन्यानंतर आमदारकी सोडाच पण हे तालुक्यात पण दिसणार नाही. भाजप सक्षम आहे, भाजपच्या माध्यमातून नक्की या योजना पुर्ण करणार आहे. त्यामुळे याने शेवटच्या चार महिन्यात जनतेची दिशाभूल करु नये. चार महिन्यानंतर काय घडेल हे याने ठरवू नये.
आम्ही सत्तेसाठी, आमदारकीसाठी भाजपमध्ये आलो नाही. भाजप जो उमेदवार देईल, या डागाळलेल्या आमदाराला गाडल्याशिवाय राहणार नाही.