ETV Bharat / state

Beating a Pregnant Forest Woman Security Guard : याआधीही अनेकांना त्रास; साताऱ्यातील गर्भवती वनरक्षक मारहाण प्रकरणी माहिती समोर - satara forest department latest news

साताऱ्यात गर्भवती वनरक्षकास लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण ( Beating a Pregnant Forest Woman Security Guard )करणारा रामचंद्र जानकर याच्या कृत्याचे विविध कारनामे पुढे आले आहेत. यापुर्वी त्याने एका शिक्षकालाही असाच त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे.

Beating a Pregnant Woman
साताऱ्यातील गर्भवती वनरक्षक मारहाण प्रकरणी माहिती समोर
author img

By

Published : Jan 21, 2022, 5:30 PM IST

Updated : Jan 21, 2022, 6:29 PM IST

सातारा - गर्भवती वनरक्षकास लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण ( Beating a Pregnant Forest Woman Security Guard )करणारा रामचंद्र जानकर याच्या कृत्याचे विविध कारनामे पुढे आले आहेत. यापुर्वी त्याने एका शिक्षकालाही असाच त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे. मारहाण प्रकरणी जानकर व त्याच्या पत्नीची न्यायालयाने ३ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी ( Accused Ramchandra Jankar and His Wife Sent in Police Custody ) केली.

याबाबत माहिती देताना मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेट बेन

अनेकांना दिलाय त्रास -

मारहाण प्रकरणानंतर रामचंद्र जानकर याचे विविध कारनामे पुढे आले आहेत. त्याचे राजकीय क्षेत्रात लागेबांधे आहेत. त्याचा उपयोग करुन तो गावात जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सोईची भुमिका घ्यायला लावायचा. जो ऐकणार नाही त्याविरोधात तक्रारी सुरू व्हायच्या. यापुर्वीचे शिक्षक, कहसूल कर्मचारी मेटाकूटिस आले होते, असे ग्रामस्थ खासगीत सांगतात.

जानकर दाम्पत्याची कोठडीत रवानगी -

प्राणी गणनेसाठी वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार रामचंद्र व प्रतिभा जानकर यांनी केला. पळसावडे (ता. सातारा) येथे हा प्रकार घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली होती. याबाबत सोशल मीडियातून मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने याची दखल घेत पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी मध्यरात्रीच जानकर दाम्पत्याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा - Beating a Pregnant Woman : साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेस अमानुष मारहाण; महिला आयोगाने घेतली दखल

मुख्य वनसंरक्षकांनी केली पिडीतेची विचारपूस -

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेट बेन यांनी साताऱ्यात पीडिता सिंधू सानप यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. वनविभाग पुर्णपणे सिंधू यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन डाॅ. बेन यांनी दिले. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डाॅ.निवृत्ती चव्हाण उपस्थित होते.

रामचंद्र जानकरची हकालपट्टी -

संयुक्त वन संरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र गंगाराम जानकर याची वनविभागाने हकालपट्टी केली आहे. पळसावडे येथील महिला वनरक्षक सिंधू सानप यांना केलेल्या मारहाणप्रकरणी ही हकालपट्टी करण्यात आली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती पळसावडे या समितीच्या अध्यक्षपदावरून तत्काळ प्रभावाने त्यांना काढून टाकण्यात यावे, असे आदेश उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिले.

Last Updated : Jan 21, 2022, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.