सातारा- तालुक्यातील खटाव येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पळशी फोडण्याचा प्रयत्न बुधवारी मध्यरात्री करण्यात आला. मात्र, औंध पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आहे. यामुळे जिल्ह्यातील बँका किती असुरक्षित आहेत, हे पुन्हा दिसून आले आहे. मागील दोन महिन्यापूर्वी पुसेसावळी येथील बँक अशीच फोडण्यात आली होती.
हेही वाचा- इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेलाही 'कोरोना'चा फटका, किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ
खटाव तालुक्यातील पळशी या गावात असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मध्यरात्री बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, गस्त घालत (पेट्रोलिंग) असलेल्या औंध पोलीस ठाण्याचे सुहास चव्हाण व सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला आहे. त्यानंतर चोरट्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.