ETV Bharat / state

कराड दक्षिणला पर्यटन करणारा आमदार नकोय! अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला - Maharashtra Assembly Elections

शिवसेना-भाजप युतीचे कराड दक्षिण मतदार संघातील उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका केली. ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभेत बोलत होते.

अतुल भोसलें यांची प्रचार सभा
author img

By

Published : Oct 4, 2019, 9:12 AM IST

सातारा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चाचपणी करूनच सातारा लोकसभेऐवजी कराड दक्षिणमधून लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, कराड दक्षिणच्या जनतेला पर्यटन करणारा आमदार नको असल्याने कराड दक्षिणची जनता पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांच्या सत्तेची मस्ती उतरवेल, अशी सणसणीत टीका कराड दक्षिणचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी केली.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, निवडणुका जाहिर झाल्यानंतर काहीजण म्हणत होते कराड दक्षिणची लढत दुरंगी होईल, तर काहीजण म्हणत होते तिरंगी होईल. माजी मुख्यमंत्र्यांनी लोकसभेला चाचपणी केली आणि विधानसभेचाही अंदाज घेतला. पण कराडकर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने त्यांचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. कारण मतदारसंघात पर्यटन करण्यापुरता येणारा लोकप्रतिनिधी जनतेला नको आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांची सत्तेची मस्ती येत्या निवडणुकीत व्याजासह कराडकर उतरवतील.

कराड शहरासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपण आणू शकलो, असे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडला जोडणारा प्रत्येक रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी भरघोस निधी मिळाला आहे. कराडची संरक्षक भिंतही मंजूर झाली आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून कराडच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. ती कायम राखण्यासाठी मला मतरूपाने आशिवार्द द्या.

पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका करताना मदनराव मोहिते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांकडे आता कोणीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या जवळचे लोक आमच्याकडे येऊन भाजपाचा प्रचार करत आहेत. त्यांनी हक्काची माणसे गमावली आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत ते नशिबाने आमदार झाले. कराड दक्षिणेत एक जुने आमदार आहेत. ते सुद्धा प्रत्येक गावात केवळ समाज मंदीर आणि स्मशानभूमी बांधण्यात पटाईत आहेत, असा टोला त्यांनी विलासकाका उंडाळकरांचा नामोल्लेख टाळून केला.

भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे पिताश्री डॉ. सुरेश भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर शरसंधान साधताना पृथ्वीराज चव्हाणांनी कराडचा कोणताही विकास केलेला नाही. मुख्यमंत्री असताना त्यांच्या हाताला लकवा भरला होता, अशी टीका केली.

Intro:कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चाचपणी करूनच सातारा लोकसभेऐवजी कराड दक्षिणमधून लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, कराड दक्षिणच्या जनतेला पर्यटन करणारा आमदार नको असल्याने कराड दक्षिणची जनता पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांच्या सत्तेची मस्ती उतरवतील, अशी सणसणीत टीका कराड दक्षिणचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी केली.
Body:उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, निवडणुका जाहिर झाल्यानंतर काहीजण म्हणत होते कराड दक्षिणची लढत दुरंगी होईल, तर काहीजण म्हणत होते तिरंगी होईल. माजी मुख्यमंत्र्यांनी लोकसभेला चाचपणी केली आणि विधानसभेचाही अंदाज घेतला. पण कराडकर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने त्यांचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. कारण मतदारसंघात पर्यटन करण्यापुरता येणारा लोकप्रतिनिधी जनतेला नको आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांची सत्तेची मस्ती येत्या निवडणुकीत व्याजासह कराडकर उतरवतील.
कराड शहरासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपण आणू शकलो, असे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडला जोडणारा प्रत्येक रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी भरघोस निधी मिळाला आहे. कराडची संरक्षक भिंतही मंजूर झाली आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून कराडच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. ती कायम राखण्यासाठी मला मतरूपाने आशिवार्द द्या.
पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका करताना मदनराव मोहिते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांकडे आता कोणीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या जवळचे लोक आमच्याकडे येऊन भाजपाचा प्रचार करत आहेत. त्यांनी हक्काची माणसे गमावली आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत ते नशिबाने आमदार झाले. कराड दक्षिणेत एक जुने आमदार आहेत. ते सुद्धा प्रत्येक गावात केवळ समाज मंदीर आणि स्मशानभूमी बांधण्यात पटाईत आहेत, असा टोला त्यांनी विलासकाका उंडाळकरांचा नामोल्लेख टाळून केला.
भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे पिताश्री डॉ. सुरेश भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर शरसंधान साधताना पृथ्वीराज चव्हाणांनी कराडचा कोणताही विकास केलेला नाही. मुख्यमंत्री असताना त्यांच्या हाताला लकवा भरला होता, अशी टीका केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.