सातारा: घरासमोर बसण्याच्या कारणावरून तरूणावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना कराड शहर पोलिसांच्या Karad City Police गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. निशिकांत शिंदे आणि परशुराम रमेश करवले, अशी त्यांची नावे आहेत. Karad Crime त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीची 2 पिस्तुले आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही संशयितांना अटक: कराडमधील मुजावर कॉलनीत घरासमोर बसण्याच्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडून एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी शाहरुख मुल्ला याने कराड शहर पोलीस ठाण्यात Karad City Police Station निशिकांत शिंदे आणि परशुराम करवले यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंद केली होती. Karad City Police Stationवरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्याकडे तपास दिला होता. बाबर यांच्या पथकाने निशिकांत शिंदे यास कराड आणि तडीपार गुंड परशुराम करवले याला आटपाडी ता. खानापूर जि. सांगली येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
2 पिस्तुलांसह धारदार चाकू जप्त: अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किंमतीची 2 पिस्तुले आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, तब्बसुम शादीवान, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, कुलदीप कोळी, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, सागर भोसले, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, माणिक थोरात, सोनाली मोहिते यांनी ही कारवाई केली आहे.
तडीपार गुंडाला झाली होती अटक: देशी बनावटीची पिस्टल विक्री करण्यासाठी आल्यानंतर परशुराम रमेश कुरवले (रा. सोमवार पेठ, कराड, सध्या रा. आटपाडी, जि. सांगली) या तडीपार गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माण तालुक्यातील शेणवडी फाटा येथे सापळा रचून पकडले होते. त्याच्याकडून 2 पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल जप्त केली होती.