सातारा - कराड पाठोपाठ जावळीतील आणखी एका तरुणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे. काल नव्याने पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या कोरोना बाधितांचे निकटचे संबंधीत आहेत.
सातारा जिल्ह्यात काल (मंगळवार) एकाच दिवशी तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात कराड तालुक्यातील दोन तर जावळी तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
यासोबतच, नागपूर येथून प्रवास करुन आलेला युवक कोरोना बाधित म्हणून कराडमध्ये उपचार घेत आहे. कालचे कराडचे दोघे हे त्या युवकाचे निकटचे संबंधीत आहेत.
जावळीतील एका बाधित रुग्णाच्या सानिध्यात आलेला 21 वर्षीय तरुण जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल होता. त्याचा काल रात्री उशीरा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 17 झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी..
- सातारा : 1
- कराड : 8
- पाटण : 1
- जावळी : 5
- खंडाळा : 1
- फलटण : 1