सातारा - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज आणि उद्या (रविवारी) ते सातार्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौर्याची सुरवात करणार आहेत. त्यांच्या दौर्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज सायंकाळी सातार्यात - राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचे शनिवारी सायंकाळी सहा वाजता सातार्यात आगमन होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने त्यांचे सातारा शासकिय विश्रामगृहात स्वागत होणार आहे. रविवारी सकाळी साडे दहा वाजता ते रयत शिक्षण संस्थेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौर्यास सुरवात करणार आहेत. त्यानंतर सातारा शासकिय विश्रामगृहात दुपारपर्यंत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट - रविवारी दुपारी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट देणार आहेत. अमित ठाकरे यांच्या स्वागताची सातारा जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली असून या दौर्यामुळे तरूणांमध्ये मोठी उत्सुकता आणि उत्साह आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा - अमित ठाकरे यांनी यापुर्वी मुंबई, कोकण, ठाणे, पालघर आणि नाशिक, पुणे दौरा पूर्ण केला आहे. त्या दौर्यांमध्ये तरूणांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता, असे अमित ठाकरेंनी सांगितले होते. तसेच गणेशोत्सवानंतर मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी ऑक्टोबरमध्ये मराठवाडा दौरा केला. आता ते पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा - Amit Thackeray माध्यमांशी बोलण्याचे काम संजय राऊतांचे असून ते माझे काम नाही