ETV Bharat / state

साताऱ्यात ऑलआऊट ऑपरेशन; 4 तासांत तब्बल दीड लाखांचा दंड वसूल - सातारा

साताऱ्यात लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज (बुधवार) जिल्ह्यात राबविलेल्या 'ऑलआऊट ऑपरेशन'मध्ये 511 वाहने ताब्यात घेण्यात आली. तर नऊ दुकानांवर कारवाई करत विविध कलमांखाली सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. ऑलआऊट ऑपरेशनसाठी सातारा जिल्ह्यात एकूण १३२ पॉईंट नेमलेले होते. यासाठी तब्बल 937 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Allout operation in Satara
साताऱ्यात ऑलआऊट ऑपरेशन; 4 तासांत तब्बल दीड लाखांचा दंड वसूल
author img

By

Published : May 5, 2021, 12:56 PM IST

सातारा - लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज (बुधवार) जिल्ह्यात राबविलेल्या 'ऑलआऊट ऑपरेशन'मध्ये 511 वाहने ताब्यात घेण्यात आली. तर नऊ दुकानांवर कारवाई करत विविध कलमांखाली सुमारे दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

'ऑलआऊट ऑपरेशन'

अतिरीक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोविड-१९ या विषाणूच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'ब्रेक द चेन' ही मोहिम राबविली असून शासनाच्या या आदेशाच्या अनुशंगाने जमावबंदी निर्बंध जारी केलेले आहेत. या आदेशास अनुसरुन सातारा जिल्ह्यातील जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आजपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाने संपुर्ण जिल्ह्यात आज सकाळी ७ ते ११ या वेळेत 'ऑलआऊट ऑपरेशन' राबविले.

साताऱ्यात ऑलआऊट ऑपरेशन; 4 तासांत तब्बल दीड लाखांचा दंड वसूल

विनाकारण फिरणाऱ्या ३६७ जणांवर कारवाई

या मोहिमेत ७३ चारचाकी वाहने व ४३८ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. १३ चारचाकी वाहने व २०० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. विनामास्क फिरणा-या व्यक्तींवर २८८ केसेस करुन ६१ हजार १०० रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच सोशल डिस्टंन्सींग न पाळणारे दुकाने/व्यक्तीं विरुध्द ९ केसेस करुन ६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. या दरम्यान वाहनावरुन विनाकारण फिरणा-यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत ३६७ केसेस करुन ८२ हजार १०० रुपये दंड वसुल करण्यात आला.

तब्बल 937 कर्मचारी रस्त्यांवर

ऑलआऊट ऑपरेशनसाठी सातारा जिल्ह्यात एकूण १३२ पॉईंट नेमलेले होते. याकामी ६६ पोलीस अधिकारी, ४८९ अंमलदार व ३८२ होमगार्ड असे मनुष्यबळ वापरण्यात आले. प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन होण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 'ऑल आऊट ऑपरेशन' मोहिम वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याचे धीरज पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.