ETV Bharat / state

रमाई घरकुल योजनेतील 250 लाभार्थीना मंजुरी पत्राचे वाटप - 250 beneficiaries of Ramai Gharkul Yojana

रमाई घरकुल योजनेतून एकाच वेळी तब्बल 250 लाभार्थीना मंजुरी पत्र देण्यात आले.

patan
रमाई घरकुल योजनेतील 250 लाभार्थीना मंजुरी पत्राचे वाटप
author img

By

Published : Feb 25, 2020, 6:42 PM IST

सातारा - पाटण पंचायत समितीत रमाई घरकुल योजनेतून एकाच वेळी तब्बल 250 लाभार्थीना मंजुरी पत्र देण्यात आले. दरम्यान, या कामासाठी पंचायत समिती सभापती, उपसभापती व प्रशासनाचे कौतूक करण्यात आले.

येणाऱ्या काळात विकासात्मक उपक्रम राबवण्यात यावेत त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली. पाटण पंचायत समितीच्यावतीने सन 2019-20 साठी रमाई घरकुल योजनेतंर्गत 250 लाभार्थीना घरकूल मंजूरी पत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सदस्य बबनराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, राजकीय सत्ता येतात व जातात पण ज्या विश्वासाने जनता आपल्या ताब्यात सत्ता देते तो विश्वास टिकवून त्याला पात्र रहाणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य असले पाहिजे. आजवर पंचायत समितीची सत्ता ही अनेकदा दोलायमान स्थितीत असल्याने सामाजिक कार्य करताना राजकीय अडचणी निर्माण व्हायच्या. मात्र आपल्या हातात जनतेने एक हाती सत्ता दिल्यामुळे पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली. एकहाती सत्ता असल्याने असे लोकाभिमुख उपक्रम येथे राबविण्यात यश मिळाले आहे.सभापती शेलार म्हणाले, आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी आम्हाला विचारांचा वारसा दिला आहे.

निवडणुकीपुरते राजकारण आणि कायम समाजकारण ही शिकवण असल्याने मग कोणत्याही कार्यक्रमात राजकीय गट-तट न पहाता सर्वसामान्य माणूस आणि त्याच्यापर्यंत अधिकाधिक विकास पोहोचविणे एवढेच कर्तव्य मानून येथे आम्ही काम करतो आणि त्यात यशस्वी ठरतो याचाही आम्हाला अभिमान असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना यमाई घरकुल योजनेचे मंजुरी पत्र देण्यात आले. उपसभापती प्रतापराव देसाई यांनी स्वागत केले. सदस्य बबनराव कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.