सातारा - अजिंक्यतारा किल्ला सुशोभाीकरण करणाच्या विषयाला सातारा पालिकेच्या इतिहासातील पहिल्या किल्ले अजिंक्यतारावरील विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. ही सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली राजसदरेवर पार पडली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाबाहेर ही सभा झाली.
स्ट्रीट लाईट, ओपन जीम करा -
अॅड. दत्ता बनकर यांनी अजिंक्यताऱ्याच्या सुशोभिकरणाच्या विषयाची माहिती दिली. शेखर मोरे-पाटील यांनी गडाच्या वाटेवरील स्ट्रीट लाईट, ओपन जीम सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली. ऐतिहासिक अशा सभेला सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. शेखर मोरे-पाटील यांनी किल्ले अजिंक्यताऱ्यावर येणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवावी किल्ल्यावर ओपन जीमही सुरु करावी अशी मागणी केली.
सुशोभिजरणाचा डीपीआर बनवणार -
महाराष्ट्रातील नामांकित आर्किटेक्ट यांच्याकडून किल्ला सुशोभिकरणाचा डीपीआर तयार करण्यात येईल. गडावरील तलावांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. गडावरील राजसदर असेल, मंदिरे असतील त्यांचेही नुतनीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यात समावेश करण्यात येणार आहे. साउंड इफेक्ट देवून प्रयत्न केले जातील. पालिकेच्या चालू बजेटमध्ये अजिंक्यताऱ्यासाठी तरतूद करू, असे मत अॅड. दत्ता बनकर यांनी मांडले.
हा तर महाराष्ट्राचा गौरव -
नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, येथे सभा घेण्याविषयी आम्हाला इच्छा होते. मात्र, तांत्रिक अडचणी होत्या. आज विशेष सभा किल्ल्यावर होत असून हा मोठा महाराष्ट्राचा गौरव आहे. सभेत बाळासाहेब ढेकणे, निशांत पाटील यांची भाषणे झाली. या सभेत सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी विषय वाचन केले. इंदिरा गांधी या साताऱ्यात आल्या होत्या. तेव्हा शाहीर फरांदे यांनी एक पोवाडा गायला होता. तोच पोवाडा आज राजसदरेवर बाळासाहेब ढेकणे यांनी सादर केला. गडावर गड अजिंक्य गड असा तो पोवाडा आहे.