ETV Bharat / state

कराडमध्ये कृषी प्रदर्शन; १ टन वजनाच्या रेड्यासह 'पोंगणूर' गाय ठरली आकर्षण - रेडा

कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने कराडमध्ये गेली 16 वर्षे 'यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशु-पक्षी' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात १ टन वजनाचा रेडा, आंध्र प्रदेशातील 'पोंगणूर' जातीची शेळीएवढ्या उंचीची गाय आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 28, 2019, 2:01 AM IST

सातारा - कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने कराडमध्ये गेली १६ वर्षे 'यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशु-पक्षी' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात १ टन वजनाचा रेडा, आंध्र प्रदेशातील 'पोंगणूर' जातीची शेळीएवढ्या उंचीची गाय आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

हेही वाचा - प्रज्ञासिंह यांचे पुन्हा नथूराम गोडसे प्रेम.. संबोधले 'देशभक्त', लोकसभेत गदारोळ

यंदाच्या प्रदर्शनात विविध कंपन्यांचे नाविन्यपूर्ण स्टॉल लावण्यात आले आहेत. गीर, देशी खिलार जातीच्या गाई, संकरीत आणि पंढरपुरी म्हैसेनेही शेतकर्‍यांचे लक्ष वेधले आहे. तीन दिवसांत सुमारे 8 लाख लोकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली आहे.

हेही वाचा - सोशल मीडियावर भन्नाट मीम्स... मी पुन्हा येईन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणक्य

माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. परदेशी कंपन्यांनीही या प्रदर्शनात स्टॉल्स लावले आहेत. आधुनिक पध्दतीची शेती औजारे, खते, बियाणे, यंत्रे पाहण्यासाठी बळीराजा गर्दी करत आहे. ऊस, फुले, फळे, पशु, पक्ष्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत. श्वान प्रदर्शनातील विविध जातींचे श्वान पाहण्यासाठी तसेच त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे.

हेही वाचा - सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषी प्रदर्शन आयोजित केले जात असल्यामुळे दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात येते. यंदा राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी प्रगतशील शेतकर्‍यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Intro:कराडच्या यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशु-पक्षी प्रदर्शनात १ टन वजनाचा रेडा, आंध्र प्रदेशातील पोंगणूर जातीची शेळीएवढ्या उंचीची गाय शेतकर्‍यांचे आकर्षण ठरली. गीर तसेच देशी खिलार जातीच्या गाई, संकरीत आणि पंढरपुरी म्हैशीनेही शेतकर्‍यांचे लक्ष वेधले. Body:
    कराड (सातारा) - कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आणि शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने कराडमध्ये गेली 16 वर्षे यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या प्रदर्शनात विविध कंपन्यांचे नाविन्यपूर्ण स्टॉल सहभागी झाले आहेत. तसेच एन टन वजनाचा रेडा, आंध्र प्रदेशातील उत्पत्ती असलेली पोंगणूर जातीची शेळीएवढ्या उंचीची गाय शेतकर्‍यांचे आकर्षण ठरली. त्याशिवाय गीर, देशी खिलार जातीच्या गाई, संकरीत आणि पंढरपुरी म्हैशीनेही शेतकर्‍यांचे लक्ष वेधले. तीन दिवसांत सुमारे 8 लाख लोकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली आहे.
    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार जोपासत गेली 50 वर्षे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी सहकार मंत्री, लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून आणि कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने 15 वर्षापूर्वी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त यशवंत कृषी-औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शनाला प्रारंभ झाला होता. दि. 24 ते 28 नोव्हेंबर असे चार दिवस कृषी प्रदर्शन सुरू असते. परदेशातील कंपन्यांचे स्टॉल्सही प्रदर्शनात सहभागी होतात. आधुनिक पध्दतीची शेती औजारे, खते, बियाणे, यंत्रे या प्रदर्शनात शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेतात. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत आहेत. ऊस, फुले, फळे, पशु, पक्ष्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. पशु-पक्षी, फुले प्रदर्शनात जनावरे, रंगीबेरंगी जातीची फुले आकर्षण ठरली. श्वान प्रदर्शनातील विविध जातीचे श्वान पाहण्यासाठी तसेच त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यात लोकांमध्ये उत्सुकता होती. 
   स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषी प्रदर्शन आयोजित केले जात असल्यामुळे दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात येते. यंदा राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी प्रगतशील शेतकर्‍यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.