ETV Bharat / state

Koyna Dam Gates Closed पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा - कोयना धरण दरवाजे बंद झाले

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद Koyna dam Six gates closed करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणात प्रतिसेकंद १३ हजार ८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरण
कोयना धरण
author img

By

Published : Aug 22, 2022, 9:53 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद Koyna dam Six gates closed करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात प्रतिसेकंद १३ हजार ८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.

दहा दिवसांनी दरवाजे बंद : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने दि. ११ ऑगस्ट रोजी पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. १२ ऑगस्ट) धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडून ८००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले होते. १५ ऑगस्टनंतर दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले होते. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करता आली. पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

कोयना धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा : कोयना धरणात सध्या ९६.११ टीएमसी पाणीसाठा असून धरण ९१ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरणात १३, ८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू ठेवला आहे. सोमवारी दिवसभरात कोयनानगर आणि नवजा येथे प्रत्येकी २१ मिलीमीटर, तर महाबळेश्वर येथे ५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा - Self Defense Lesson अमरावतीत महिला, युवती होत आहेत स्वसंरक्षणासाठी सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.