ETV Bharat / state

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराडमध्ये ३८६ जणांवर कारवाई, ५९ हजाराचा दंड वसूल - 59 thousand fine recovered

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराड पोलिसांनी 386 जणांवर कारवाई केली. यावेळी पोलीसांनी 59 हजार रूपयांचा दंड वसूल केला.

Action on 386 people in Karad on New Year's Eve
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराडमध्ये ३८६ जणांवर कारवाई, ५९ हजाराचा दंड वसूल
author img

By

Published : Jan 2, 2021, 2:34 AM IST

कराड (सातारा) - नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराड पोलिसांनी एकूण ३८६ जणांवर विविध कायद्यान्वये कारवाई करत ५९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍या २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराड पोलिसांनी कराड शहर तसेच परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. हुल्लडबाजी रोखण्यासह कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस फौजफाटा मुख्य रस्त्यांवर तैनात होता. यावेळी पोलिसांनी मोटर वाहन आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये नियमभंग करणार्‍यांवर कारवाई केली. मद्य प्राशन करून वाहन चालवविणार्‍या २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. धोकादायकरित्या वाहन चालविणार्‍या तीन वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. विना परवाना वाहन चालविल्याप्रकरणी ११ आणि वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३५२, अशा एकूण ३८६ जणांवरील कारवाईत ५८ हजार ९०० रुपये दंड वसू करण्यात आले आहेत.

नववर्षाच्या स्वागतावेळी हुल्लडबाजीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी रात्री साडे दहापर्यंतच हॉटेल्स आणि ढाब्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रात्री अकरानंतर शहरासह परिसरात कमालीची शांतता होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.