ETV Bharat / state

कराडजवळील अपघातात ठाणे येथील दोन महिला जागीच ठार, चौघे जखमी - भीषण धडक

कोर्टी (ता. कराड) हद्दीत महामार्गावरील राजस्थानी राजपुरोहित ढाब्यासमोर रस्त्याच्याकडेला एक ट्रक (क्र. एमएच 12 डीटी 077) उभा होता. पहाटे साडे सहाच्या सुमारास सातार्‍याकडून कोल्हापूरकडे भरधाव निघालेल्या इनोव्हा कारने (एमएच 05 ईए 2642) पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारमधील परमजीत भटनागर (वय 45) आणि वंशिका विक्रम शेट्टी (वय 16) या दोघी जागीच ठार झाल्या.

अपघातात ठाणे येथील दोन महिला जागीच ठार
अपघातात ठाणे येथील दोन महिला जागीच ठार
author img

By

Published : Nov 12, 2021, 12:44 PM IST

सातारा - ट्रकला इनोव्हा कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर चौघेजण जखमी झाले. गुरूवारी (दि. 11) पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. परमजीत अविनाश भटनागर (रा. रिजन्सी पार्क, कल्याण ठाणे) आणि वंशिका विक्रम शेट्टी (रा. खडक पाडा, कल्याण-ठाणे) अशी मृतांची नावे आहेत. कश्या अविनाश भटनागर, विक्रम श्रीधर शेट्टी, अद्वीता विक्रम शेट्टी आणि चालक अविनाश महेशचंद्रा भटनागर हे जखमी झाले आहेत.

अपघातात ठाणे येथील दोन महिला जागीच ठार
अपघातात ठाणे येथील दोन महिला जागीच ठार

थांबलेल्या ट्रकला धडक -

कोर्टी (ता. कराड) हद्दीत महामार्गावरील राजस्थानी राजपुरोहित ढाब्यासमोर रस्त्याच्याकडेला एक ट्रक (क्र. एमएच 12 डीटी 077) उभा होता. पहाटे साडे सहाच्या सुमारास सातार्‍याकडून कोल्हापूरकडे भरधाव निघालेल्या इनोव्हा कारने (एमएच 05 ईए 2642) पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारमधील परमजीत भटनागर (वय 45) आणि वंशिका विक्रम शेट्टी (वय 16) या दोघी जागीच ठार झाल्या. कश्या अविनाश भटनागर (वय 13), विक्रम श्रीधर शेट्टी (वय 51), अद्वीता विक्रम शेट्टी (वय 17) आणि चालक अविनाश भटनागर हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग हेल्पलाईनचे दस्तगीर आगा आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना कराडमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार अभय भोसले हे तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.