ETV Bharat / state

Accidental Death in Khambataki : पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; खंबाटकी बोगद्याजवळ आढळला मृतदेह - Accident on Pune Satara Road

Accidental Death in Khambataki Tunnel : पाच दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याबाहेर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालाय. ध्रुव सोनवणे असं त्याचं नाव आहे.

Accidental Death in Khambataki Tunnel
Accidental Death in Khambataki Tunnel
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 6:51 AM IST

सातारा : Accidental Death in Khambataki Tunnel : पुण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याबाहेर (Khambataki Tunnel) भीषण अपघातात मृत्यू झालाय. ध्रुव स्वप्निल सोनवणे असं त्याचं नाव आहे. पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. खंबाटकी बोगद्यातून बाहेर पडताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झालाय. कुजलेल्या मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आलीय. (Accident on Pune Satara Road)

पाच दिनसांपासून होता बेपत्ता : ध्रुव सोनवणे हा १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटूंबीयांनी पुण्यातील हिंजवडी येथे ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. गेली पाच दिवस कुटुंबीय आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. तब्बल पाच दिवसानंतर अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर ध्रुव सोनवणे याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय.

साताऱ्याहून परत जाताना झाला अपघात : ध्रुव सोनावणे हा त्याच्या टीव्हीएस आपाची दुचाकीवरून १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घराबाहेर पडला. पुण्याहून अतित (ता .सातारा) पर्यंत आला आणि तिथून परत पुण्याकडे जाताना पहाटे चारच्या सुमारास खंबाटकी बोगद्याच्या बाहेरील वळणावर दुचाकीसह तो चरीत कोसळला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी गवत वाढल्यामुळे तो कोणाच्याही नजरेस पडला नाही. मात्र शुक्रवारी गवत कापण्याचं काम सुरू असताना मजुरांना त्याचा मृतदेह दिसला. पाच दिवस मृतदेह राहिल्याने कुजण्यास सुरुवात झाली होती. मजुरांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीसांना दिली.

भुईंज पोलिसांची तत्परता : अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, खंडाळ्याच्या पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, पोलीस हवालदार संजय पोळ, शरद यादव, प्रकाश फरांदे, सचिन शेलार, दत्ता दिघे यांच्यासह शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे खंडाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. Punjab Accident: भरधावातील बस लोखंडी अँगलला धडकून कालव्यात कोसळली, ८ प्रवाशांचा मृत्यू
  2. Teacher Drown in Well : नवीन कार घेतलेल्या शिक्षकाचा कारसह विहिरीत बुडून मृत्यू, एका चुकीनं झाला अपघात
  3. Telangana Tourist Car Accident : चिखलदरा फिरायला आलेल्या तेलंगाणातील पर्यटकांच्या कारचा अपघात; चार बँक अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.