सातारा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहीर (ता. वाई) येथील उड्डाणपुलावर मोटार आणि ट्रक अपघातात दोन ठार तर चार जण जखमी झाले. हा अपघात पहाटे झाला. मृत व जखमी सांगली जिल्ह्यातील आहेत.
दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू-
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीने जोशी विहीर उड्डाणपुलावर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीतील सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना दोन जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सुभाष बाबुराव पाटील (वय ७२, रा.बोरगाव,ता. तासगाव, सांगली) व प्रवीण नामदेव टेगिमाळी (वय १८, दत्त कॉलनी, जत, सांगली) अशी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये महेश महादेव नवाळे (वय ४२,विटा,सांगली), शुभांगी महेश नवाळे (वय ३२,विटा,सांगली, शबाना मोहम्मद पठाण (वय 38 वर्षे, रा.विटा, जि. सांगली), प्रणव दीपक लोंढे (गय २१, वाळुंज, खानापूर,सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
सर्वजण सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्वजण व्यापारी असून ते कावीळ रोगावरील औषधोपचारासाठी नाशिक येथे चालले होते. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे करत आहेत.
हेही वाचा- राज्यात मंगळवारी 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 56 मृत्यू