ETV Bharat / state

बिग बॉसचे पर्व गाजवणाऱ्या अभिजीत बिचुकलेला सेटवरुन अटक, हे आहे कारण - arrested

साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व गाजवणाऱ्या अभिजित बिचुकले याला अटक अटक करण्यात आली आहे. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत

अभिजीत बिचुकलेला अटक
author img

By

Published : Jun 21, 2019, 3:41 PM IST

Updated : Jun 21, 2019, 4:27 PM IST

सातारा - साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व गाजवणाऱ्या अभिजित बिचुकले याला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी गोरेगावच्या आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून अटक केली.

बिचुकले सध्या आरे पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन दिवसांपूर्वी बिचुकलेला घरातून बाहेर काढण्याची महिला संघटनांनी मागणी केली होती. एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर न्यायमूर्ती आवटी यांच्याकडे हा खटला खटला सुरू होता. आवटी यांनी याप्रकरणी बिचुकलेला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर एलसिबीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेची शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे यामागे नक्की काय घडलं याची चर्चा सूरु आहे. त्याच्या अटकेनंतर आता त्याचा बिग बॉसमधील प्रवास इथेच संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते

कोण आहे अभिजीत बिचुकले -
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. सध्या अभिजीत बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक असून यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.

Intro:Body:

[6/21, 2:34 PM] Viraj Mule Entertainment: साताऱ्यातील जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिग बॉसच दुसरं पर्व गाजवणाऱ्या अभिजित बिचुकले याना अटक

[6/21, 2:34 PM] Viraj Mule Entertainment: सातारा पोलिसांनी गोरेगावच्या आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून केली अटक

[6/21, 2:37 PM] Viraj Mule Entertainment: बिचुकले सद्या आरे पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांपूर्वी बिचुकलेला घरातून बाहेर काढण्याची महिला संघटनांनी मागणी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे या मागे नक्की काय घडलं याची चर्चा सूरु

[6/21, 2:39 PM] Viraj Mule Entertainment: बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाला घरात येऊन अटक होण्याची पहिलीच घटना

[6/21, 3:00 PM] Manoj Joshi, Hyderabad: Visuals have

Conclusion:
Last Updated : Jun 21, 2019, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.