ETV Bharat / state

गमेवाडी गावात बिबट्याचा बछडा शेतात मृतावस्थेत आढळला - leopard death case

कराड तालुक्यातील गमेवाडी गावात माळ नावाच्या शिवारात बिबट्याचा चार महिन्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला.

बिबट्याचा मृत्यू
बिबट्याचा मृत्यू
author img

By

Published : Dec 17, 2020, 6:52 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील गमेवाडी गावातील माळ शिवारात बिबट्याचा चार महिन्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. गेल्या तीन महिन्यात दोन बिबटे शेतात मृतावस्थेत आढळले असून एका बिबट्याचा निमोनिया आजाराने मृत्यू झाला आहे.

उसाच्या शेतातील सरीत दिसला बिबट्या-

डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गमेवाडी गावातील तळीचा माळ नावाच्या शिवारात कारखान्याची ऊसतोड सुरू होती. यावेळी हणमंत चंदू जाधव यांना त्यांच्या शेजारच्या उसाच्या शेतातील सरीत बिबट्या दिसला. बिबट्याला पाहून ते दचकले. परंतु, बिबट्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्यावरून बछड्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी बांधला. तातडीने गावात येऊन पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना माहिती दिली. त्यांनी वन कर्मचार्‍यांना कळवताच वनक्षेत्रपाल ए. पी. गमरे हे वन कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

मृत बछडा हा अंदाजे चार-पाच महिन्यांचा-

मृत बछडा हा अंदाजे चार-पाच महिन्यांचा होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, बिबट्याने जन्म दिलेल्या पिल्लांपैकी एखादे पिल्लू कमजोर असल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.

हेही वाचा- पुण्यात सुरू होणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, क्रीडा मंत्र्यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.