ETV Bharat / state

साताऱ्यात 65 वर्षीय वृध्देची धारदार शस्त्राने हत्या

सकाळी साडेनऊच्या दरम्यान गायकवाड यांच्या बंगल्याचे फाटक उघडे असल्याचे एका भाडेकरूच्या लक्षात आले. आवाज देऊनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने भाडेकरूंनी घरात डोकावले असता, जया गायकवाड या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली.

author img

By

Published : Jan 17, 2021, 10:15 AM IST

satara
साताऱ्यात 65 वर्षीय वृध्देची धारदार शस्त्राने हत्या

सातारा - कृष्णानगर येथे गजानन सोसायटीत राहणार्‍या 65 वर्षीय वृद्धेची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या करणारा हा परिचयातील असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जया गणेश गायकवाड-पाटील असे त्या वृद्धेचे नाव आहे.

शनिवारी रात्री झाली हत्या -

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जया गायकवाड या केशव निवास येथे एकट्याच राहण्यास होत्या. त्यांचा मुलगा शेंद्रे येथे रहावयास असून मुलगी मुंबईला शिक्षिका आहे. गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे सहा भाडेकरू रहावयास आहेत. सकाळी साडेनऊच्या दरम्यान गायकवाड यांच्या बंगल्याचे फाटक उघडे असल्याचे एका भाडेकरूच्या लक्षात आले. आवाज देऊनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने भाडेकरूंनी घरात डोकावले असता, जया गायकवाड या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली.

मारेकरी परिचितांपैकी शक्य-

गायकवाड यांच्या मानेवर मागील बाजूस धारदार शस्त्राने वार केल्याची खूण आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात मारेकऱ्याचा चोरीचा कोणताही उद्देश्य नव्हता, मारेकरी हा परिचयातलाच कोणी असावा, असा अंदाज सातारा शहर पोलिसांचा तपास सुरू झाला असून ठिकठिकाणी शोध पथकांची मोहीम सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.