ETV Bharat / state

साताऱ्यातील आंबेघर भूस्खलन दुर्घटनेतील ६ जणांचे मृतदेह हाती, मदत कार्याला वेग - दरड कोसळून गावातील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली

पाटण तालुक्यातील आंबेघर येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेतील ६ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत. एनडीआरएफकडून आंबेघर गावात वेगाने मदतकार्य सुरू आहे. मात्र, पाऊस आणि चिखलामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

मदत कार्याला वेग
मदत कार्याला वेग
author img

By

Published : Jul 24, 2021, 5:19 PM IST

Updated : Jul 24, 2021, 5:40 PM IST

कराड (सातारा) - साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेतील ६ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत. एनडीआरएफकडून आंबेघर गावात वेगाने मदतकार्य सुरू आहे. मात्र, पाऊस आणि चिखलामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

साताऱ्यातील आंबेघर भूस्खलन दुर्घटनेतील ६ जणांचे मृतदेह हाती

पाऊस, चिखलामुळे मदत कार्यात अडचणी

पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलन झाले. आंबेघर गावावर दरड कोसळून गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेची माहिती समजताच प्रशासकीय अधिकारी तातडीने आंबेघर गावाकडे रवाना झाले होते. परंतु पावसाची संततधार आणि रस्त्यावर पाणी आल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला देखील घटनास्थळी लवकर पोहोचता आले नाही. अखेर कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून रबरी बूट आणि लॉन्चमधून एनडीआरएफचे पथक आंबेघरमध्ये पोहोचले. गावात पोहोचताच मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत ६ जणांचे मृतदेह आढळले आहेत. पाऊस आणि चिखलामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. या दुर्घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले आहेत, याची आकडेवारी मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर हाती येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा महाड येथील तळये गावाचा दौरा

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथील तळये गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 'तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल', अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

हेही वाचा - तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री

Last Updated : Jul 24, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.