सातारा: स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल विक्रीप्रकरणी महेंद्र प्रकाश पावरा (रा. उमर्टी, जळगाव), वैभव बाळासो वाघमोडे (बलवडी, सांगली) आणि अशोक विठ्ठल कार्वे (रा. येरवळे, ता. कराड, जि. सातारा) यांना अटक केली आहे.
सापळा रचून संशयितांना पकडले: मध्यप्रदेशातील देशी बनावटीच्या पिस्तुलांची महाराष्ट्रात तस्करी आणि विक्री करणारा महेंद्र प्रकाश पावरा हा पिस्तुलांची विक्री करण्यासाठी साताऱ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा-पुणे महामार्गावरील विरमाडे गावच्या हद्दीत सापळा रचला गेला. यावेळी महेंद्र पावरा, वैभव वाघमोडे आणि अशोक विठ्ठल कार्वे हे तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांची झडती घेतली असता एकाकडे ३ लाख २७ हजार रुपये किंमतीची ५ देशी बनावटीची पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे आढळली. त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने पिस्तुल तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तर काही तस्कर सातारा सोडून पळाले आहेत.
३२ पिस्तुलांसह ४० काडतुसे जप्त: सातारा स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेली एकूण ३२ देशी बनावटीची पिस्तुले आणि ४० जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पिस्तुले आणि काडतुसे मध्य प्रदेशातून आणली जात असल्याची माहिती तपासात पुढे आली. जळगावमधील महेंद्र पावरा हा पिस्तुले विक्रीसाठी आणत होता.
सातारा 'एलसीबी'ची दमदार कारवाई: काही दिवसांपूर्वी सातारा 'एलसीबी'ने चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद केली होती. त्यानंतर ५ कोटीचे 'अंबरग्रीस' जप्त करून व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा डाव हाणून पाडला होता. बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यासह गुन्हेगारांवर तडीपारी तसेच मोक्का कारवाई देखील केली आहे.
हेही वाचा:
- Student Barred From Tata Institute: लैंगिक छळाची तक्रार केल्याने 'तिला' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास मनाई
- Bird Hit Nagpur Pune Flight : नागपुरात विमानाला पक्ष्याची धडक; 'टेक ऑफ' करताना घडली घटना
- Pradeep Kurulkar ATS Custody : प्रदीप कुरुलकरला एक दिवसाची 'एटीएस' कोठडी; हनी ट्रॅपमध्ये अजून एक एअर फोर्सचा अधिकारी?