ETV Bharat / state

४० वर्षाच्या व्यक्तीची शस्त्राने वार करून हत्या; स्मशानभूमीत आढळला मृतदेह - Body Was Found In Cemetery

Satara Murder Case : सातारा जिल्हा आणखी एका हत्येच्या घटनेने हादरला आहे. पाटण शहरात 40 वर्षीय इसमाचा धारदार शास्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला असून तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Satara Murder Case
धारदार शस्त्राने वार करून हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:15 PM IST

सातारा Satara Murder Case : राज्यात गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमध्ये भर चौकात शस्त्राने सपासप वार करून तरुणाची हत्या (Satara Murder News) करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, पाटणमध्येही एकाचा अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश परशुराम पवार (Prakash Pawar) (मानेवाडी, सातारा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

खून झालेली व्यक्ती साताऱ्यातील : पाटण शहरातील चाफोली रोड परिसरात असलेल्या बीएसएनएल कार्यालयासमोरील स्मशानभूमीमध्ये रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अज्ञाताने धारधार शस्त्राने डोक्यात, कपाळावर आणि उजव्या कानावर वार करून ही हत्या केली आहे. खून झालेली व्यक्ती कातकरी समाजातील तसेच मूळची मानेवाडी, सातारा येथील आहे. सासरवाडी असलेल्या पाटणमध्ये तो राहत होता.

संशयिताच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना : याप्रकरणी संतोष चंद्रकांत पवार यांनी पाटण पोलीस ठाण्यात (Patan Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयिताच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच हत्येमागील कारणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भंगार विक्री करून उदरनिर्वाह : खून झालेली व्यक्ती आणि त्याचा मुलगा असे दोघेजण पाटणमध्ये राहून भंगार गोळा करून विक्री करायचे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. मृतदेहाचा पंचनामा करून पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. घरासमोर दुचाकीचा हॉर्न मोठ्यानं वाजविणं पडलं महागात; भाडेकरूकडून घरमालकाची हत्या
  2. सेक्स रंगात आला, इतक्यात झाला वाद; दणादण वार करून सेक्स वर्करची हत्या
  3. कराडमध्ये शस्त्राने सपासप वार करून तरूणाची भर चौकात हत्या, हल्लेखोर फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.