सातारा : परदेशातून आलेल्या एका दाम्पत्यासह त्यांची एक मुलगी असे तिघे कोरोना बाधित आढळून आले (3 Peoples Found Covid Positive In Satara) आहेत. एकूण सहा पैकी तिन प्रवासी बाधित असून त्यांच्यावर फलटणच्या ग्रामीण रुग्णालयात (Phaltan Rural Hospital) उपचार सुरु आहेत.
एकूण ६ प्रवासी
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण (Civil Surgeon Dr Subhash Chavhan) यांनी याबाबतची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. जिल्हा प्रशासनाला परदेशी प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची यादी मिळते. त्यात फलटण येथील सहा प्रवाशांचा समावेश होता. युगांडा, दक्षिण आफ्रीका (Uganda South Africa) येथून चार व इंग्लंड आणि न्यूझीलंडमधून प्रत्येकी एक प्रवासी ९ डिसेंबर रोजी भारतात आला. फलटणला आल्यानंतर या सहाही प्रवाशांची चाचणी करण्यात आली.
दोघांचे अहवाल अस्पष्ट
त्यामध्ये युगांडामधून दोन मुलींसह एक दाम्पत्य आले. या कुटुंबातील एका मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित तिघे कोरोना बाधित आहेत. इंग्लड व न्युझीलंडमधून आलेल्या प्रवाशांचे नमूने 'इन कन्क्लिझिव्ह' असल्याचे डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांमध्ये कोणतेही चिन्ह, लक्षणे नाहीत. साच्युरेशन 99 टक्के असल्याचे डाॅ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Corona In Satara : परदेशातून आलेल्या दाम्पत्यासह मुलगी कोरोना बाधित - युगांडा दक्षिण आफ्रीका
नवीन ओमायक्रॉन व्हॅरिएंटच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी (Corona testing of foreign passengers) साताऱ्यात करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना कोरोनाची लागण (3 Peoples Found Covid Positive In Satara) झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील आहेत.