ETV Bharat / state

कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण - quake jolts koyana

कोयना धरण परिसर रविवारी सायंकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.9 एवढी नोंदविली गेली आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Oct 25, 2021, 1:11 PM IST

कराड : कोयना धरण परिसर रविवारी सायंकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.9 एवढी नोंदविली गेली आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कोयनानगर, पाटण, कराड, पोफळी, चिपळूण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. दरम्यान, भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कुठेही हानी झाली नसल्याचे पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी सांगितले.

कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंदविली गेली. या सौम्य भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कोयनानगर, पाटण, कराड, पोफळी, चिपळूण या परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र कोयना धरणापासून 28 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यातील तनाली गावच्या पश्चिमेस 12 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे केंद्र भूगर्भात 15 किलोमीटर खोलवर नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, भूकंपामुळे कोयना धरण परिसराला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही.

परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोयना धरणाचा पायथा वीजगृह बंद करण्यात आला होता. परंतु, पुर्वेकडील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे शुक्रवारपासून (दि. 22) पायथा वीजगृह कार्यान्वित करून 1050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सांगली पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केल्याने पायथा वीजगृह कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याचे धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा - कोयना धरणाचे दरवाजे बंद, पावसाचा जोरही ओसरला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.