ETV Bharat / state

सातारा: तीन कोरोनाबाधित आढळूनही दोन दिवसानंतर गावामध्ये कंटेनमेंट झोन - माणमध्ये कोरोना रुग्ण आढळले

दहिवडी (ता.माण) येथील एक डॉक्टर व इतर दोघे कोरोनाबाधित झाल्याचे वृत समजताच माण तालुक्यात खळबळ उडाली. 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर देखील नगरपंचायत प्रशासनला जाग आली नाही. 2 दिवस उलटून गेल्यानंतर कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे.

3 corona positive cases found in man in satara
3 कोरोनाबाधित आढळल्यानंतरही 2 दिवसानंतर गावामध्ये कंटेनमेंट झोन
author img

By

Published : Jun 21, 2020, 4:08 PM IST

Updated : Jun 21, 2020, 5:29 PM IST

सातारा - दहिवडी (ता.माण) येथील एक डॉक्टर व इतर दोघे कोरोनाबाधित झाल्याचे वृत समजताच माण तालुक्यात खळबळ उडाली. 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतरही नगरपंचायत प्रशासनाला जाग आली नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतर कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या तालुक्यातील 300 ते 350 रूग्ण व्यक्तींना क्वारंटाईन करणे गरजेचे आहे.

महेश जाधव, प्रतिनिधी ईटीव्ही भारत
या डॉक्टरांकडे एक कोरोनाबाधीत रूग्ण आला होता. ही माहिती समजताच त्या डॉक्टरांनीही आपली तपासणी करून घेतली असता तेही बाधित असल्याचे समोर आले. मात्र, यादरम्यान त्यांच्या रुग्णालयात तालुक्यातील विविध गावातील 300 ते 350 रूग्ण व इतर व्यक्ती आले असल्याचे समजते आहे. त्यावेळी त्यांनी ते रूग्ण तपासले होते. तर त्यांचा समवेत इतर नागरिकदेखील आले होते. डॉक्टरबाधित असल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत गावातील काही भाग बंद केला. मात्र, नगरपंचायत अधिकारी याकडे फिरकले नाहीत.कोणकोणत्या गावातील पेशंट आलेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती देत क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत.

Last Updated : Jun 21, 2020, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.