सातारा - जिल्ह्यात शनिवारी 2 हजार 379 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
साताऱ्याबरोबरच फलटणमध्ये कोरोनाचा जोर कायम -
बाधितांमध्ये सातत्याने सातारा तालुक्यातील रुग्णसंख्या अधिक राहिली आहे. याशिवाय फलटण तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या हा प्रशासनापुढे चिंतेचा विषय राहिला आहे. तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 446 (27286), फलटण 436 (15952), कराड 270 (17761), कोरेगांव 228 (10186), वाई 176 (9031), खंडाळा 176 (7419), जावली 102 (5760), खटाव 216 (10436), माण 129 (7741), महाबळेश्वर 27 (3511), पाटण 143 (5063) व इतर 30 (670) असे आज अखेर एकूण 1 लाख 20 हजार 824 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
सातारा-कराडमध्ये अधिक मृत्यू -
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. कराड 10 (495), सातारा 12 (826), खंडाळा 2 (94), खटाव 5 (289), कोरेगांव 2 (257), माण 4 (159), महाबळेश्वर 0 (36), पाटण 3 (128), फलटण 3 (206), जावली 0 (108) व वाई 3 (228) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 1936 नागरिकांना डिस्चार्ज -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1936 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यातील कोरोना स्थिती -
* एकूण बाधित -1 लाख 20 हजार 804
* घरी सोडण्यात आलेले - 96 हजार 70
* मृत्यू - 2 हजार 828
* उपचारार्थ रुग्ण-21 हजार 847