सातारा - जिल्ह्यात नव्याने आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 280 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली.
कोरेगाव-माणमध्ये अंकांची उसळी
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावळी 76 (5984), कराड 148 (18279), खंडाळा 133 (7723), खटाव 214(10931), कोरेगांव 344 (10679), माण 308 (8280), महाबळेश्वर 17 (3545), पाटण 90 (5101), फलटण 337 (16657), सातारा 436 (28252), वाई 165 (9344 ) व इतर 12 (697) असे आज अखेर एकूण 125472 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत.
30 पैकी 7 मृत्यू साता-यात
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (127), कराड 2 (505), खंडाळा 1 (98), खटाव 6 (300), कोरेगांव 3 (263), माण 1 (163), महाबळेश्वर 2 (38), पाटण 0 (129), फलटण 2 (210), सातारा 7 (846), वाई 5 (238) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 917 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
अडीच हजार नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 506 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. अद्याप 22 हजार 435 रुग्ण उपचार घेत आहेत.
ह्ही वाचा - खासदार-आमदारांना आडवा', मराठा आरक्षणावरून उदयनराजे भडकले