ETV Bharat / state

साताऱ्यात 19 जण कोरोनाग्रस्त, बाधितांचा आकडा 618 वर - सातारा न्यूज

शुक्रवारी (दि. 5 जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार साताऱ्यात 19 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 618वर पोहोचला आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 6, 2020, 12:21 PM IST

सातारा - जिल्ह्यातील 19 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी (दि. 5 जून) रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे वडगाव (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे त्याच्यात होती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
शुक्रवारी (दि. 5 जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यातील होळ येथील 7 व तांबवे येथील 6, कराड तालुक्यातील तुळसण येथील 5 तर खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आज 618 वर गेला आहे. यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील 11 पुरुष व आठ महिलांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्रवास करून आलेला तर उर्वरित 18 जण कोरोनाबाधिताच्या सहवासात होते.

हेही वाचा - 'नरेंद्र मोदींमुळे देशाचे अर्थिक, सामाजिक अन् परराष्ट्र धोरणात मोठे नुकसान'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.