ETV Bharat / state

COVID-19:दिलासादायक..! साताऱ्यातील 14 महिन्यांचा मुलगा 'निगेटिव्ह'

एका 14 महिन्याच्या मुलाला अचानक ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील स्वॅबचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.

14-month-old-boy-report-of-corona-virus-in-negative-in-satara
साताऱ्यातील 14 महिन्यांचे मुल 'निगेटिव्ह'
author img

By

Published : Mar 28, 2020, 12:47 PM IST

सातारा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. अशातच जिल्ह्यातील एका 14 महिन्याच्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी या मुलाला दाखल करण्यात आले. मात्र, मुलाचा वैद्यकीय अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे.

साताऱ्यातील 14 महिन्यांचे मुल 'निगेटिव्ह'

हेही वाचा- कोरोनाचा फटका: राज्यातील स्थायी व इतर समित्यांच्या निवडणुकांना सरकारची स्थगिती

एका 14 महिन्याच्या मुलाला अचानक ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला तत्काळ क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या घशातील स्वॅबचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 32 वर्षीय युवकालाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर खासगी रुग्णालये, मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने व आरोग्य विषयक खासगी आस्थापना सुरू ठेवणे संबंधितांवर बंधनकारक आहे. तसेच दुकानात हॅन्डवॉश, सॅनिटायझर आदी उपाययोजना ठेवणेही बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

बाधिताच्या संपर्कातील दोघे रुग्णालयात दाखल...

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सातारा जिल्ह्यातील 2 निकट सहवासितांना आज जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.