सातारा- जिल्हयातील कोरेगाव तालुक्यातील वाठार हद्दीत घोरपडीची शिकार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संशयिताने शिकारी कुत्र्याच्या मदतीने घोरपडींची शिकार केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत तब्बल 13 घोरपडी जप्त करण्यात आल्याने वाठार परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी श्रीरंग श्रीपती चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यात असणाऱ्या कुत्र्यांसह मोटरसायकल आणि इतर मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. दरम्यान, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सध्या वनविभाग करीत आहे.