ETV Bharat / state

साताऱ्यात शिकाऱ्याकडून १३ घोरपडीसह शिकारी कुत्रा जप्त - reptile news satara

घोरपड हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला व्यापक संरक्षण दिले आहे. समाजातील अपप्रवृत्तीमुळे या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला पर्यायाने निसर्गाच्या अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे.

13-reptile-and-hunting-dogs-seized-in-satara
साताऱ्यात शिकाऱ्याकडून १३ घोरपडीसह शिकारी कुत्रा जप्त
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:30 PM IST

सातारा - येथील सातारा-लोणंद रस्त्यावर वनाधिकाऱ्यांनी एका शिकाऱ्याकडून १३ घोरपडी हस्तगत केल्या. हा प्रशिक्षीत शिकारी कुत्र्यामार्फत घोरपडीच्या ठिकाणाचा माग काढुन जिवंत घोरपडी पकडत होता. मांस विक्रीच्या उद्देशाने त्या पकडण्यात आल्या असाव्यात असा अंदाज वर्तवला जात आहे.

साताऱ्यात शिकाऱ्याकडून १३ घोरपडीसह शिकारी कुत्रा जप्त

हेही वाचा- चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर यांनी ही कारवाई यशस्वी केली. श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय 60, रा. पिंपोडे खुर्द ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याची आज २ दोन दिवसांच्या वनकोठडीत रवानगी केली.

शनिवारी पथक गस्त घालत असताना सातारा-लोणंद रोडवर लोणंदच्या दिशेकडून येणारी मोटरसायकल त्यांना संशयास्पद वाटली. पथकाने मोटारसायकल थांबवून तपासणी केली. त्यावेळी श्रीरंग यांच्याकडे असणाऱ्या पोत्यात १३ घोरपड आढळल्या. तसेच त्याच्यासोबत शिकार करण्यासाठी पाळीव शिकारी कुत्रे होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडील शिकारी कुत्रा, मोटार सायकल (क्र. एमएच 11 ए ई 867), 12 जिवंत व 1 मृत घोरपड व शिकारीकरीता वापरलेले साहित्य जप्त केले आले.

घोरपड हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला व्यापक संरक्षण दिले आहे. समाजातील अपप्रवृत्तीमुळे या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला पर्यायाने निसर्गाच्या अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. घोरपडीच्या मांसाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातुनच सामान्य लोकांकडून घोरपडीचे मांस विकत घेतले जाते. परंतु,वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अन्वये शिकार करणाऱ्याबरोबरच मांस घेणारा देखील गुन्हेगार असून याच कायदयाच्या नुसार 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंत कैद व 10 हजार रुपय‍ांपर्यंत दंडाची तरतुद आहे.

मांसाच्या लोभापायी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये व अशा प्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याची शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. अथवा 1926 या वनविभागाचे टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी केले आहे.

Intro:सातारा : सातारा-लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) जवळ वनाधिका-यांनी एका शिका-याकडून १३ घोरपडी हस्तगत केल्या. यातील संशयीत प्रशिक्षीत शिकारी कुत्र्यामार्फत घोरपडीच्या ठिकाणाचा माग काढुन मग त्यांना जिवंत पकडत होता. मांस विक्रीच्या उद्देशाने त्या पकडण्यात आल्या असाव्यात असा कयास आहे.Body:वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश  नेहरकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.

श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय 60, रा. पिंपोडे खुर्द ता. कोरेगाव) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याची आज २ दोन दिवसांच्या वनकोठडीत रवानगी केली.

शनिवारी हे पथक गस्त घालत असताना  सातारा - लोणंद रोडवर, वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे लोणंदच्या दिशेकडून  येणारी मोटरसायकल संशयास्पद वाटली. पथकाने थांबवुन तपासणी केली. त्यावेळी मोटारसायकल चालक श्रीरंग श्रीपती चव्हाण यांच्याकडे असणा-या पोतडयांमध्ये १३ घोरपड बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळुन आल्या.  तसेच या संशयितासोबत शिकार  करण्यासाठी पाळीव शिकारी कुत्रे होते.

संशयिताला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असुन त्याच्याकडील शिकारी कुत्रा, मोटार सायकल (क्र. एमएच 11 ए ई 867), 12 जिवंत व 1 मृत घोरपड व शिकारीकरीता वापरलेले साहित्य जप्तकरण्यात आले. संशयिताविरुद्धी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 नुसार गुन्हा करण्यात आला अाहे. संशयिताने या घोरपडी मांस  विक्रीसाठी पकडल्या असाव्यात असा वनाधिका-यांचा कयास आहे.

घोरपड हा वन्यप्राणी निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये याला व्यापक संरक्षण दिले आहे. समाजातील  अपप्रवृत्तीमुळे या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला पर्यायाने निसर्गाच्या अन्नसाखळीलाधोका निर्माण झाला आहे. घोरपडीच्या मांसाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातुनच सामान्य लोकांकडुन घोरपडीचे मांस विकत घेतले जाते. परंतु वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अन्वये शिकार करणारा बरोबरच मांस घेणारा देखील गुन्हेगार असुन याच कायदयाच्या कलम 51 अन्वये याला 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंत कैद व 10 हजार रुपय‍ांपर्यंत  दंडाची तरतुद आहे. 

या गुन्हयांत वापरण्यात आलेल्या प्रशिक्षीत शिकारी कुत्र्याचा पुन्हा शिकारीस‍ाठी वापर होऊ नये म्हणून ते अन्य जिल्ह्यात सोडून देण्यात येणार असल्याचे वनाधिका-य‍ांनी सांगितले.

चौकट ..
मांसाच्या लोभापायी अशा गंभीर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ नये व अशा प्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याची शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधुन अथवा 1926 या वनविभागाचे टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.