सातारा : सातारा सैनिक स्कूल अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.
रखडलेल्या विकासाला चालना
देशात काही निवडक शहरात सैनिक स्कूल आहेत. त्यामध्ये सातारा शहराचाही समावेश आहे. या सैनिक स्कूलचा अंतर्गत विकास व्हावा, विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक बाबी विकसित व्हाव्यात आणि हे सैनिक स्कूल परिपूर्णतेने सुसज्ज व्हावे यासाठी भरीव निधीची गरज होती. याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा सैनिक स्कूलसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अजितदादांची साथ -
वित्त खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असून शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार पवार यांनी सैनिक स्कूलसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अजितदादा पवार यांच्यासह यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षण मंत्री गायकवाड आणि पालकमंत्री पाटील यांचे जिल्हावासियांच्या वतीने आभार मानले आहेत.
हेही वाचा - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड बादशाह अल्ली मुल्ला यांचे निधन
हेही वाचा - लवकरच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल अन् भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल - रामदास आठवले