ETV Bharat / state

सातारा जिल्ह्याला 100 कोटींचा निधी; पुनर्वसनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची अजित पवार यांची सूचना - ajit pawar visit satara

सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : Jul 27, 2021, 1:00 AM IST

Updated : Jul 27, 2021, 2:38 AM IST

सातारा - अतिवृष्टी झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून सातारा जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबर या घटनेतील मृतांच्या वारसांना सात लाख रुपयांची मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागांचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना केल्या.

माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल -

अजित पवार म्हणाले, नैसर्गिक घटनांशी सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बोटी व वस्तूंची खरेदी करा. दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, अनेक गावे संपर्कहीन होताना दिसून येत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधावेत. तसेच, गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे आठवडाभरात पूर्ण करा. बाधित नागरिकांना चांगली घरे दिली जातील. कोयना वसाहतीतील घर दुरुस्तीसाठी निधी देणार आहे. याचबरोबर भूस्खलन झालेल्या लोकांना महसूल आणि वनविभागाच्या जागा उपलब्ध करून द्या.

अजिंक्यताऱयाबाबत सर्व्हे करा-

अतिवृष्टीत नुकसान झाले आहे त्यांचे पुनर्वसन जलसंपदा अथवा वनविभागाच्या जागेत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांना दगडाचा धोका आहे. त्यामुळे त्याचा सर्व्हे करून सातारा पालिकेला त्यात सहभागी करून घ्यावे, असे आदेश पवारांनी दिले. यावर अजिंक्यतारा किल्ला संरक्षण भिंतीचे काम करणे आवश्यक असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगताच यासाठी किती निधी आवश्यक आहे, याची माहिती उद्या संध्याकाळपर्यंत पाठवा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

NDRF उभारण्याची मागणी करणार -

अजित पवार यांनी बैठकीत सांगितलेल्या प्रत्येक बाबींची पूर्तता १५ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देत या बाबतीत मी कोणाचे ऐकणार नसल्याचेही अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच, दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने मदत मिळण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी कऱ्हाड येथे एसडीआरएफ केंद्र व्हावे, अशी मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना 7 लाख -

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख, केंद्र शासनाकडून 2 लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाखाचाही लाभ देण्यात यावा. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यात किंवा खराब झाल्या आहेत अशा गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केल्या. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

Last Updated : Jul 27, 2021, 2:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.