ETV Bharat / state

कराड, पाटण तालुक्यातील १० जण कोरोना पॉझिटिव्ह - कराडमधील कोरोनाबाधितांची संख्या

रविवारी (दि. 21 जून) रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार कराड तालुक्यात तीन व पाटण तालुक्यात सात कोरोना बाधितांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jun 22, 2020, 1:24 PM IST

कराड (सातारा) - रविवारी (दि. 21 जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार कराड तालुक्यातील तीन आणि पाटण तालुक्यातील सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय दोन तरुण आणि 24 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कराड पंचायत समितीच्या एका माजी सभापतीसह त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण, 11 वर्षांची मुलगी, हावलेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय तरुणी आणि बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, अशा सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई, पुणे आणि परराज्यात अडकलेले नागरिक पाटण तालुक्यातील आपल्या मूळ गावी येऊ लागल्याने कोरोनाबाधितांची साखळी वाढली आहे. त्यापूर्वी पाटण तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता.

सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता 838 वर पोहोचला आहे. त्यापैकी 643 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत 39 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 156 बाधित रुग्णांवर (अॅक्टीव्ह) विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. रविवारी (दि. 21 जून) 3 हजार 870 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी (दि. 21 जून) कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

हेही वाचा - हॉटेलमध्ये डॉक्टरच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी; 20 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.