ETV Bharat / state

लग्न मालकास 10 हजाराचा दंड, क्रिकेट खेळणार्‍या तरुणांवर कारवाई - Group Development Officer Meen Salunkhe

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. असेच रासाटी (ता. पाटण) येथे परिसरात एका लग्नात डीजे लावून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे निदर्शनास आले.

नियम मोडून लग्न केल्याने कारवाई
नियम मोडून लग्न केल्याने कारवाई
author img

By

Published : May 11, 2021, 7:31 PM IST

कराड - पाटण तालुक्यातील कोयनानगरचा परिसर कोरोनाचा हॉट्सस्पॉट ठरला आहे. आतापर्यंत या भागात कोरोनाने १३ जणांचा बळी घेतला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला असताना रासाटी गावात डीजे लावून लग्न लागले. यानंतर या लग्न सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या लोकांना पाटण तहसीलदारांनी १० हजाराचा दंड आकारला. तर गटविकास अधिकार्‍यांनी गोषटवाडीत क्रिकेट खेळणार्‍या तरुणांना ताब्यात घेतले.

लग्न समारंभात नियम व अटी पाळाव्यात याबाबत सुचना करताना तहसीलदार योगेश टोम्पे

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. असेच रासाटी (ता. पाटण) येथे परिसरात एका लग्नात डीजे लावून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे आणि गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी या लग्न सोहळ्यातील संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. दरम्यान लग्न समारंभाच्या मालकास १० हजाराचा दंड ठोठावला.

क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर कारवाई

गटविकास अधिकारी मीना साळुंखे आपल्या पथकासह कोयनानगरमध्ये असताना त्यांना गोषटवाडी येथे काही तरुण क्रिकेट खेळताना आढळले. त्यांनी आपल्या पथकातील कर्मचार्‍यांसह तरुणांचा पाठलाग करून या तरुणांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सध्या कोयनानगर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून येथे आजपर्यंत कोरोनाने १३ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे प्रशासनाने या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. परिस्थिती गंभीर असतानादेखील कोरोना नियम पायदळी तुडवून धुमधडाक्यात लग्नाचे बार उडत आहेत. तसेच सामाजिक अंतराचे पालन, मास्कचा वापर याकडेही नागरिकांनी कानाडोळा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा - आधी लग्न कोंढाण्याचे, रुग्ण सेवेसाठी नागपुरातील डॉक्टर तरुणीने मोडले स्वतःचे लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.