ETV Bharat / state

Life Sentence : किरकोळ वादातून खून केल्याप्रकरणी तरुणास जन्मठेपेची शिक्षा - murder over petty dispute

सांगली न्यायालयाने किरकोळ वादातून खून ( Murder over petty dispute ) करणाऱ्या 24 वर्षीय आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ( Accused sentenced to life imprisonment ) सुनावली आहे.

Life Sentence
Life Sentence
author img

By

Published : Nov 17, 2022, 5:05 PM IST

सांगली - किरकोळ वादातून खून ( Murder over petty dispute ) करणाऱ्या 24 वर्षीय आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ( Accused sentenced to life imprisonment ) सुनावण्यात आली आहे. सांगली न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. कुणाल शिखरे,असे या आरोपीचे नाव असून पलूस तालुक्यातील बुर्ली येथे ही खुनाची घटना घडली होती.

किरकोळ वादातून झाला होता खून - पलूस तालुक्यातल्या बुर्ली या ठिकाणी दुर्गामाता मिरवणुकी दरम्यान किरकोळ वादातून गणेश शिखरे याची हत्या झाली होती.कुणाल शिखरे याच्यासोबत गणेश शिखरे याचा हा वाद झाला होता.ज्यातून कुणाल याने गणेशाचा चाकूने भोसकून खून केला होता,त्यापूर्वीही एक महिना आधी मयत कुणाल शिखरे हिच्या बहिणीला काहीतरी वाईट बोलल्यामुळे कुणाला आणि गणेश यांच्यात वाद झाला होता.

जन्मठेपेची शिक्षा सुनावली - 18 ऑक्टोंबर 2018 रोजी किरकोळ वादातून कुणाल याने गणेश याचा खून केला होता.पलूस पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या खुणाचा गुन्हा दाखल झाला होता,कुणाला याला अटक करत सांगली न्यायालयांमध्ये त्याच्या विरोधात खटला सुरू होता. यामध्ये 14 साक्षीदार तपासण्यात आले,ज्यामध्ये सबळपुरावे व साक्ष ग्राह्य धरून सांगली न्यायालयाने गणेश शिखरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे,सदर खटल्यात सौ.आरती देशपांडे साठविलकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.