ETV Bharat / state

CORONA : घानंद येथे तरुणाने चक्क झाडावर स्वत:ला केले क्वारंटाईन

author img

By

Published : Jul 3, 2020, 11:49 AM IST

सांगली जिल्ह्यात सध्या क्वारंटाईन असलेल्या तरूणाची चर्चा सुरू आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या घानंद येथील परशुराम कुमठे हा तरुण आहे. गलाई व्यवसायिक असणारा हा परशुराम कामनिमित्ताने कर्नाटकच्या मैसूर-उटी मध्ये होता.

youngster quarantined himself on tree
घानंद येथे तरूणाने चक्क झाडावर केले क्वारंटाईन

सांगली - घर, शाळा, लॉज याठिकाणी क्वारंटाईन होतं हे आपल्याला माहीत आहे. मात्र, झाडावरही क्वारंटाईन होऊ शकते. हे एकूण आश्चर्य वाटेल. सांगलीच्या एका तरुणाने स्वतःला चक्क झाडावर क्वारंटाईन करून घेतले आहे. आटपाडी येथील घानंदमध्ये हा तरुण क्वारंटाईन काळ पूर्ण करत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्वारंटाईन महत्त्वाचे मानले जाते. परराज्यातून, इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना विशेषतः क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूशनल आणि होम क्वारंटाईन या पद्धतीने विलगीकरण करण्यात येते. जर एखादा कोरोना संशयित असल्यास त्यास शासनाच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले जाते. ज्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन सक्तीचे आहे.

सांगली जिल्ह्यात सध्या क्वारंटाईन असलेल्या तरुणाची चर्चा सुरू आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या घानंद येथील परशुराम कुमठे हा तरुण आहे. गलाई व्यवसायिक असणारा हा परशुराम कामनिमित्ताने कर्नाटकच्या मैसूर-उटी मध्ये होता. मात्र, दहा दिवसांपूर्वी तो तरुण आपल्या गावी परतला. प्रशासनाकडून त्याला १४ दिवसांसाठी होमक्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, घरात इतरही लोक असल्याने आणि घर फार मोठे नसल्यामुळे कुठे राहायचे? हा प्रश्न होता.

घरासमोरच असणाऱ्या जागेत तरुणासाठी घरच्यांनी व गाव पातळीवर समितीने घरासमोर झोपडी करण्याचा निर्णय घेतला. मग एक छोटीशी झोपडी उभी सुद्धा झाली. त्या झोपडीमध्ये तरुणांने आपले बस्तान बसवले. पहिला दिवस कसाबसा पार पडला. मात्र, त्याठिकाणी वीज नाही दिवसभर अंधार, उकाडा तसेच छोट्या झोपडीत बसून अक्षरशः कंटाळून जात असल्याने, तरुणाने शेजारीच असणार्‍या एका वडाच्या झाडावर होम क्वारंटाईन सुरू केले. झाडावर त्याने आपली राहण्याची पूर्ण व्यवस्था करून घेतली. दिवसभर हा तरुण त्या झाडावर निवांतपणे राहतो, त्यासाठी त्या ठिकाणी मचान सुद्धा बांधून घेतले आहे.

भल्या मोठ्या झाडाच्या सानिध्यात हा तरुण आता क्वारंटाईन झाला आहे. त्याचे नातेवाईक सुद्धा त्याला या झाडावरच जेवण, पाणी आणि ज्या काही गोष्टी लागणार आहेत, त्या दोरीच्या साह्याने पोहोचवत आहेत. रात्र झाली की, हा तरुण झाडावरून खाली येऊन आपल्या झोपडीत जाऊन झोपतो. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्या झाडावरच्या तरुणाचे क्वारंटाईन सुरू आहे.

"झोपडीमध्ये उकडत असल्याने एक दिवस झाडा वरती येऊन बसलो. कल्पना सुचली की येथे मचान बनवूया, त्यानंतर एक-दोन दिवसांमध्ये मचान बनवला. त्या झोपडीपेक्षा झाडावरच्या मचानावर बरे वाटते. तसेच झाडावर दिवसभर सावली असते. निसर्ग छान दिसतो, सोबत मोबाईल आणि निसर्गरम्य वातावरण असल्याने मन रमते" असे आनंदाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.