सांगली - महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर अतुल पाटील या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सांगली शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या - विष घेऊन थेट सांगली शहर पोलिस ठाण्यातच एका तरुणाने आत्महत्या केली.अतुल गरजे-पाटील - वय 36 असे,या तरुणाचे नाव असून अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.मंगळवारी 26 एप्रिल रोजी अतुल हा शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर मृतावस्थेत आढळून आला.एका पोलिस कर्मचाऱ्याने अतुल याचा मृतदेह पाहिला, त्यानंतर त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं.
पण शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या - आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली आहे. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीच्या तगद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. सदर महिला सावकाराकडून अतुल पाटील याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्याच्या बदल्यात अतुल याने, त्या महिला सावकारास आपला चेक दिला होता. जो चेक काही महिन्यांपूर्वी बाऊन्स झाला होता. त्यानंतर महिलेने अतुल पाटील यांच्याविरोधात गुन्हेही दाखल केला होते. मात्र पैशाच्या वसुलीसाठी महिला सावकाराकडून तगादा सुरू होता. याच त्रासाला कंटाळून अतुल पाटील यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीमध्ये लिहल्याचे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले आहे.
महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात तरुणाची आत्महत्या
सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर अतुल पाटील या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली आहे. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीच्या तगद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.