सांगली - एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने लॉकडाऊनचा नियम तोडत थेट मुंबईतून सांगलीतील तासगाव गाठले आहे. चक्क एका भाजीपाल्याच्या गाडीमध्ये बसून ही महिला पोलिस कर्मचारी विनापरवाना पोहोचली. याप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस कर्मचाऱ्यास प्रशासनाकडून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत ड्युटीवर असणारी एक महिला पोलीस कर्मचारी कोणाचीही परवानगी न घेता तासगाव या आपल्या गावी पोहचली आहे. एका भाजीपाल्याच्या गाडीतून विटापर्यंत या महिला पोलीस कर्मचाऱ्याने प्रवास केला. त्यानंतर ती तासगावला आपल्या घरी पोहोचली. यानंतर शेजारच्या काही लोकांनी याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली. हा प्रकार पोलिसांच्या समोर येताच संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तासगाव पोलीस ठाण्यात संचारबंदीच्या काळात विना परवानगी आल्याप्रकरणी कलम 188 ,269, 271 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वर्दीकडूनच नियमभंग..विनापरवाना मुंबईतून आपल्या गावी परतली महिला पोलीस.. गुन्हा दाखल करून केले क्वारंटाईन
पोलीस कर्मचाऱ्याकडूनच लॉकडाऊनचा नियमभंग केल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. मुंबईत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने प्रशासनाची परवानगी न घेता चक्क भाजीपाला वाहतुकीच्या गाडीतून आपले मूळ गाव गाठले. हा प्रकार तासगाव पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला क्वारंटाईन करण्यात आले.