सांगली- जत पूर्व भागालगत असणार्या कर्नाटक सीमा भागात तुबची बबलेश्वर प्रकल्प आहे. यातून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागात पाणी देण्यासाठी काही शिष्ठ मंडळांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आहे. या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ईतर अधिकार्यांशी सविस्तर चर्चा करू अशी ग्वाही कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी दिली आहे.
भाजप, शिवसेना, रिपाई व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ संख येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना येडीयुरप्पा यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हाध्यक्ष तथा आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार विजयगौडा पाटील, आमदार विलासराव जगताप, रिपाई जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, रासप जिल्हाध्यक्ष मारूती सरगर, आर.के पाटील, सभापती सुशीला तावशी, आप्पासाहेब नामद, सरदार पाटील, अॅड. चन्नाप्पा होर्तिकर, अजित पाटील, आदी उपस्थित होते.
हेही वाचा- भाजपच्या मनात 'पेशवाई' - सचिन सावंत